Jogi Teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jogi Teaser: दिलजीत दोसांझचा 'जोगी' चित्रपटाचा टीझर रिलीज; सप्टेंबरमध्ये OTT वर प्रदर्शित होणार

या चित्रपटात दिलजीत एका शीख तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Shivani Tichkule

Jogi Teaser: दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) मुख्य भूमिकेत असलेल्या जोगी चित्रपटाचा टीझर शनिवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दिलजीत एका शीख तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची कथा एका शीख तरुणाची आहे जो 1984 मध्ये दिल्लीत झालेल्या शीख दंगलीत अडकतो. कठीण प्रसंग आणि जीवघेण्या दंगलीच्या काळात त्या तरुणाच्या धाडसाची आणि शौर्याची कथा दिग्दर्शक अली अब्बास (Ali Abbas)जफरच्या जोगी या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाचे पोस्टर काल सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यात दिलजीत जोगीच्या भूमिकेत दिसला, जो काहीही असला तरी आपल्या कुटुंबाच्या आणि मित्रांच्या पाठीशी उभा राहतो. त्यानंतर आज या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. टिझर मध्ये 1984 च्या दु:खद दंगलीपूर्वी जोगीची आणि त्याच्या कुटुंबाची सुखी संसाराची झलक दाखवण्यात आली आहे.

या चित्रपटात दिलजीतसोबत अनेक दिग्गज कलाकार दिसणार आहेत. कुमुद मिश्रा, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अयुब, हितेन तेजवानी आणि परेश रावल देखील या चित्रपटात मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 16 सप्टेंबर रोजी OTT वर रिलीज होणार आहे .

हा चित्रपट 1984 मध्ये दिल्लीत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. दंगलीच्या काळातील काही मित्रांची हृदयस्पर्शी कथा या चित्रपटात आहे. जोगीची भूमिका साकारणे हा सर्वात समाधानकारक अनुभव होता. या सुंदर कथेला जिवंत करण्यासाठी संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे. या भूमिकेसाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी अली आणि हिमांशूचे आभार मानू इच्छितो.

आता दिलजीत दोसांझचा हा चित्रपट बॅाक्सऑफिसवर किती कमाल दाखवतो , याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे .'जोगी' 16 सप्टेंबर 2022 रोजी 190 हून अधिक देशांमध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT