पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देऊ; कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची ग्वाही

कृषीमंत्री अब्दुल सत्तार विदर्भ दौऱ्यावर
Abdul Sattar
Abdul SattarSaam Tv
Published On

अमर घटारे

अमरावती - कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या जिल्ह्यातच शून्य टक्के नुकसान दाखवल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. त्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतीचे पुन्हा पंचनामे करून त्यांना योग्य मदत देऊ अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अमरावती येथील दिली.

जोपर्यंत शेतामध्ये जाणार नाही. शेताची परिस्थिती पाहणार नाही, शेतामध्ये झालेल्या नुकसानीच मूल्यमापन करणा नाही,प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणे ही वेगळं असते त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे की गावातील मंदिर मज्जिद बौद्ध विहार यांच्या माईकचा वापर करून गावात दवंडी देण्यात येईल.

हे देखील पाहा -

ज्यांच्या शेतीचे नुकसान झाले त्यांच्या शेतीची कृषी सेवक आणि तलाठी पाहणी करतील तसेच पंचनामे करतील आणि व्हिडिओ शूटिंग घेतील. त्यानुसार शेतकऱ्यांना पूर्ण संरक्षण देण्याचा जर निर्णय घेतला तर त्याची अंमलबजावणी होईल असेही कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

Abdul Sattar
Ajit Pawar : शिंदेंच्या ‘त्या’ घोषणेवर अजित पवारांचा आक्षेप; म्हणाले, भावनिक होऊन...,

65 टक्के मिमी पाऊस पडल्याने नुकसानीची जी अट आहेत तो शासनाने दिलेला निर्णय आहे. परंतु सातत्याने पाऊस पडला असेल आणि 33 टक्के नुकसान झाल असल तरी शासन त्याचा विचार करेल असेही अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले.

कृषीमंत्री सत्तार विदर्भाच्या दौऱ्यावर

अब्दुल सत्तार हे प्रथमच विदर्भात दाखल झाले आहेत. यंदा सर्वाधिक पाऊस हा याच विभागात झाला. या पावसामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता भरपाईबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. जिरायतील हेक्टरी 13 हजार 600 अशी रक्कम ठरवण्यात आली आहे. मदत निधीपूर्वी कृषी मंत्री हे पीक पाहणीसाठी विदर्भात दाखल झाले आहेत. सत्तार हे नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यातील पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com