Ajit Pawar : शिंदेंच्या ‘त्या’ घोषणेवर अजित पवारांचा आक्षेप; म्हणाले, भावनिक होऊन...,

गोविंदांना सरकारी नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून पवारांनी शिंदेंचे कान टोचले
Ajit pawar, Eknath Shinde
Ajit pawar, Eknath ShindeSaam Tv
Published On

मुंबई : शुक्रवारी राज्यभरात दहीहंडीचा (Dahi Handi) उत्सव उत्साहात पार पडला. गोविंदांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अनेक मोठ्या घोषणाही केल्या. यादरम्यान, शिंदे यांनी केलेल्या एका घोषणेवरून वाद सुरू झाला. गोविंदांना सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याची घोषणा शिंदे यांनी केली. या घोषणेला स्पर्धा परीक्षार्थी आणि ५ टक्के आरक्षणाचा लाभ मिळणाऱ्या इतर खेळाडूंनी विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात चर्चा सुरू असतानाच, विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कान टोचले. (Ajit Pawar Todays News)

Ajit pawar, Eknath Shinde
मोठी बातमी! मुंबईवर २६/११ सारख्या घातक हल्ल्याची धमकी; कंट्रोल रुमला धमकीचा मेसेज

अजित पवार आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने ते जिल्ह्यातील मेळघाट, धारणी या आदिवासी भागाला ते भेट देणार आहेत. दरम्यान, याआधी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी दहीहंडी पथकातील गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षणाचा लाभ देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविषयी विचारणा केली असता त्यांनी त्यावर सविस्तर भूमिका मांडली.

काय म्हणाले अजित पवार?

'गोविंदा पथके मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. मी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा अध्यक्ष आहे. ऑलिम्पिक मान्यता असलेल्या खेळाडूंना आपण आरक्षण ठेवले आहे. मात्र गोविंदांना आरक्षण देताना काय निकष ठेवणार'? असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला. (Ajit Pawar vs Eknath Shinde)

Ajit pawar, Eknath Shinde
Pune: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा नववा स्मृतीदिन; अंनिसतर्फे निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन

'गोविंदा पथकामध्ये सर्वात वरच्या थरावर कमी वयाचा, वजनाचा मुलगा असतो. अशा वेळी त्याचे काय क्वालिफिकेशन ग्राह्य धरणार? याची माहिती तुम्हाला कोण देणार? आता संगणकीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. खेळाडू विविध स्पर्धांमध्ये भाग घेतात. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे रेकॉर्ड असते. इथे तसे काहीच नाही', असंही पवार म्हणाले.

'मुख्यमंत्र्यांनी भावनिक निर्णय घ्यायचा नसतो, असा सल्लाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिला. पवार म्हणाले की, 'हा निर्णय झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी दहीहंडी होती. याविषयी आम्ही लगेच प्रतिक्रिया मांडली नाही, ती सोमवारी सभागृहात मांडू'.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, 'मला विम्याचा मुद्दा पटला. मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या कुटुंबीयांना १० लाखांचा विमा देण्याची घोषणा सरकारने केली. कायमचं अपंगत्व आलं तर ५ लाख रुपये मदत समजू शकतो. पण त्या व्यक्तीचं रेकॉर्ड, शिक्षण याची कोणतीही माहिती नाही. क्रीडा विभागालाही विश्वासात घेतलं नाही'.

'एकदम ५ टक्के आरक्षणाची तुम्ही घोषणा करता. कुणालाही विश्वासात न घेता आलं यांच्या मनात, केलं जाहीर. असं नसतं. १३ कोटी जनतेला साधारण काय वाटतं, याचाही विचार करायचा असतो', असंही अजित पवारांनी यावेळी नमूद केलं.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com