Dashavatar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dashavatar : 'दशावतार'ची जादू केरळमध्ये, दिलीप प्रभावळकरांचा चित्रपट मल्याळी भाषेत प्रदर्शित होणार

Dashavatar Released In Malayalam : दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' चित्रपट आता मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची रिलीज डेट जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'दशावतार' चित्रपटाने जगाला वेड लावले आहे.

'दशावतार' आता मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.

'दशावतार'मध्ये मुख्य भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर झळकले आहेत.

मराठी मनोरंजन सृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर सध्या त्यांच्या 'दशावतार' चित्रपटामुळे चांगले चर्चेत आहेत. 'दशावतार' (Dashavatar)ने प्रेक्षकांना वेड लावले आहे. या चित्रपटाचे शूटिंग कोकणात झाले आहे. 'दशावतार' चित्रपट सुबोध खानोलकर दिग्दर्शित आहे. 'दशावतार' चित्रपट 12 सप्टेंबरला प्रदर्शित झाला आहे. 'दशावतार' चित्रपटातून कोकणातील एक परंपरा आणि लोककला दाखवण्यात आली आहे.

मराठी प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर 'दशावतार' आता मल्याळी भाषेत पाहायला मिळणार आहे. 'दशावतार' रिलीज होऊन आता 50 दिवस पूर्ण झाले आहेत. 'दशावतार' चित्रपटाने जगाला वेड लावले आहे. केरळमधील प्रेक्षकांच्या आग्रहाखातर 'दशावतार' हा चित्रपट मल्याळी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. नुकतेच 'दशावतार' चित्रपटाचे मल्याळी भाषेतील पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. हा चित्रपट 21 नोव्हेंबरला केरळमध्ये प्रदर्शित होणार आहे. मराठी चित्रपट पहिल्यांदाच मल्याळी भाषेतून रिलीज होणार आहे.

सुबोध खानोलकर यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये चित्रपटाचे पोस्टर दिसत असून त्याला एक खास कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, "चित्रपटाला भाषेचे बंधन नसते! जगभरातल्या मराठी रसिक प्रेक्षकांनी ज्या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलंय, आजही देत आहेत, तो आपला 'दशावतार' आता मल्याळम भाषेतून केरळमधल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होतोय! 21 नोव्हेंबर पासून! आजही सातव्या आठवड्यात महाराष्ट्रातल्या अनेक चित्रपटगृहांमध्ये तो हाऊसफुल गर्दीत सुरु आहे!"

'दशावतार' चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी 'बाबुली मेस्त्री' या कलावंताची भूमिका साकारली आहे. 'दशावतार' चित्रपटात महेश मांजरेकर, भरत जाधव, प्रियदर्शनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, आरती वडगबाळकर, रवी काळे, सुनील तावडे आणि विजय केंकरे या कलाकारांची देखील महत्त्वाची भूमिका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिरोळच्या आमदारांच्या घोडावत खांडसरीवर शेतकऱ्यांचे आंदोलन

दिवाळीत लेकरांना कपडे घ्यायला पैसे नव्हते; नैराश्यग्रस्त शेतकरी बापाने आयुष्य संपवलं, पाहा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

'माझे प्रायव्हेट व्हिडिओ..' गर्लफ्रेंडकडून UPSCच्या विद्यार्थ्याची हत्या; Ex-बॉयफ्रेंड सिलिंडरवाल्याची मदत घेऊन काटा काढला

विवाहातील समस्या दूर करण्यासाठी तुळशीच्या लग्नाला करा 'हे' ५ सोपे उपाय, त्वरित होईल विवाह

Marathi Actor Dies: अवघ्या २५ व्या वर्षी आयुष्य संपवणारा 'हा' मराठमोळा अभिनेता कोण?

SCROLL FOR NEXT