'ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ' वरील 'पंचायत ३' वेबसीरिज प्रचंड चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या सीरीजचा तिसरा सीझन भेटीला आला. या सीरीजमधील प्रत्येक कलाकराची नेहमीच तुफान चर्चा सुरू असते. पण त्याचसोबत या सीरीजमधील गावाची म्हणजेच 'फुलेरा' गावाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. हे गाव रियलमध्ये नसून मध्य प्रदेशातील एका गावामध्ये या गावाची शुटिंग करण्यात आली आहे. पण ते नेमकं गाव कोणतं ?, कुठे आहे हे गाव ? हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. जाणून घेऊया...
जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि फैजल मलिक स्टारर 'पंचायत' वेबसीरिजने ओटीटी विश्वात प्रचंड मोठी लोकप्रियता मिळवली आहे. या वेबसीरीजचे कथानक 'फुलेरा' गावातील आहे. गावातील पंचायतचं ऑफिस, त्याच्या बाजुला असणारी पाण्याची टाकी हे सर्व दृश्य फुलेरा गावातील नसून एका दुसऱ्या गावातील आहेत. मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील महोदिया गावात या वेबसीरीजची शुटिंग करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका युजरने या गावातील व्हिडीओ शेअर केला होता. तेव्हापासून या गावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. “हा खरा फुलेरा आहे.” असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केलेला आहे.
वास्तवात राजस्थानमध्ये फुलेरा नावाचे गाव आहे. परंतु प्रत्यक्षात या वेबसीरीजमधील बहुतांश सीन्स मध्यप्रदेशातील सिहोरच्या महोदिया गावात शूट केलेले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, फुलेरा ग्रामपंचायतीतचे कार्यालय आणि पाण्याची टाकी दिसत आहे. तसचे यात महोदिया गावाचा उल्लेखही दिसत आहे. या व्हिडिओमध्ये गावाची हिरवळ आणि सौंदर्य पाहायला मिळत आहे. सिरिजमधील हे ठिकाण पाहण्यासाठी लोक या ठिकाणाला भेट देत आहेत. या व्हायरल व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, सान्विका, रघुबीर यादव, अशोक पाठक, फैझल मलिक आणि चंदन रॉय यांच्या प्रमुख भूमिकेत आहेत. ‘पंचायत’ सीरीजचे आतापर्यंत दोन सीझन आले असून गेल्या काही दिवसांपूर्वीच तिसरा सीझनही आला आहे. तिनही सीझनला चाहत्यांकडून दमदार प्रतिसाद मिळाला असून आता चाहते चौथ्या सीझनसाठी उत्सुक आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.