Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’मध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री; ६ वर्षांनंतर करतोय टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पुनरागमन

Rishi Saxena Comeback On Television Serial After Six Years : ‘आई कुठे काय करते’ ह्या मालिकेत आता लवकरच नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. मालिकेत मराठमोळा अभिनेता ऋषी सक्सेना पाहायला मिळणार आहे.
Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’मध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री; ६ वर्षांनंतर करतोय टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पुनरागमन
Rishi Saxena Comeback On Television Serial After Six YearsInstagram

आई कुठे काय करते ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत अनेक ट्विस्ट येताना दिसत आहे. मालिकेत आता लवकरच नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. मालिकेत मराठमोळा अभिनेता ऋषी सक्सेना पाहायला मिळणार आहे.

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’मध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री; ६ वर्षांनंतर करतोय टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पुनरागमन
Bigg Boss OTT 3 कधी येणार भेटीला ?, नवीन होस्ट अनिल कपूर यांनी तारीख सांगितली

ऋषी सक्सेना तब्बल ६ वर्षांनी मराठी मनोरंजनविश्वात पुनरागमन करणार आहे. मालिकेत त्याची भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मालिकेत तो कोणती भूमिका साकारणार आहे, याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. ऋषी या मालिकेत मिहीर शर्मा हे पात्र साकारणार आहे. मिहीर शर्मा उत्तम शेफ आहे. त्याची आई अरुंधतीची खूप मोठी चाहती होती. आपल्या मुलाने अरुंधतीकडून गाणं शिकावं ही तिची इच्छा होती. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मिहीर अरुंधतीकडून गाण्याचे धडे गिरवणार आहे.

या भूमिकेविषयी ऋषीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला की, स्टार प्रवाहसोबत काम करण्याची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. अखेर ती इच्छा पूर्ण होतेय. आई कुठे काय करते ही मालिका माझीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी मालिका आहे. आपल्या आवडीच्या मालिकेत काम करायला मिळणं हा माझ्यासाठी चांगला योग आहे. खरतर खूप दिवसांपासून मराठी मालिकेत कधी दिसणार अशी विचारणा होत होती. मी चांगल्या भूमिकेच्या शोधात होतो. आई कुठे काय करते मालिकेतल्या मिहीर या व्यक्तिरेखेसाठी मला विचारण्यात आलं आणि मला ही व्यक्तिरेखा खूपच भावली. जवळपास ६ वर्षांनंतर मी मराठी मालिकेत काम करतोय. शूटिंगच्या पहिल्या दिवशी थोडं टेन्शन होतं. मात्र सेटवर सगळ्यांनीच मला आपलसं करुन घेतलं. आजवर प्रेक्षकांनी माझ्या प्रत्येक भूमिकेला भरभरुन प्रेम दिलं आहे. हेच प्रेम या नव्या भूमिकेलाही देतील याची खात्री आहे,'

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’मध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री; ६ वर्षांनंतर करतोय टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पुनरागमन
Ranbir Kapoor Ramayana Movie : 'धार्मिक कथांची छेडछाड करणे योग्य नव्हे'; रणबीर- साई पल्लवीच्या 'रामायणा' वर सीता नाखूश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com