Dhurandhar 2 saam tv
मनोरंजन बातम्या

Dhurandhar 2: बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर २' ची क्रेझ; सात दिवसांत 1000 कोटींच्या कल्बमध्ये एन्ट्री

Dhurandhar 2 Day 7 Box Office: 'धुरंधर: द रिव्हेंज'ची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड सुरू आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे सातच दिवस झाले आहेत. जाणून घेऊया आतापर्यंत नेमकी किती कमाई केली.

Shruti Vilas Kadam

Dhurandhar 2 Day 7 Box Office: आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर: द रिव्हेंज हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन अवघ्या सात दिवसातच हा चित्रपट १००० कोटी क्लबच्या अगदी जवळ पोहोचला आहे. रणवीर सिंगसह सर्व कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे आणि उत्तम कथेमुळे प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद चित्रपटाला मिळत आहे. म्हणूनच चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०२ कोटींची कमाई करत नवा रेकॉर्ड केला.

चित्रपटाने पहिल्या आठवड्यात मोठी कमाई करत सगळ्यांना थक्क केले आहे. ‘पेड प्रिव्ह्यूज’मधूनच ४३ कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ८०.७२ कोटींची कमाई केली. त्यानंतर वीकेंडला चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. तिसऱ्या दिवशी ११३ कोटी आणि चौथ्या दिवशी ११४.८५ कोटींची कमाई करत ‘धुरंधर २’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला.

आठवड्याच्या सुरुवातीला देखील चित्रपटाची गती कमी झाली नाही. पाचव्या दिवशी ६५ कोटी, सहाव्या दिवशी ५६.६० कोटी आणि सातव्या दिवशी ४३.७६ कोटींची कमाई करत चित्रपटाने सात दिवसांतच अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या सात दिवसांच्या धडाकेबाज कामाईमुळे चित्रपटाची एकूण कमाई झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, धुरंधर २ ने भारतात ६१९.४८ कोटींचा टप्पा पार केला आहे. तर जागतिक स्तरावर या चित्रपटाची एकूण कमाई ९४१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे हा चित्रपट लवकरच १००० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार आहे.

या चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला

रणवीर सिंगच्या या चित्रपटाने सनी देओलचा 'गदर २' (Gadar 2) आणि शाहरुख खानचा 'पठाण' (Pathaan) या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. बुधवारी, 'धुरंधर २' ने देशात बॉक्स ऑफिसवर ६०० कोटी रुपयांचा टप्पा सहजपणे पार केला आणि विकी कौशलच्या 'छावा' या चित्रपटाची एकूण कमाईचा रेकॉर्ड मोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जालन्यातील पेट्रोल पंपावर तुफान गर्दी, पोलीस बंदोबस्तात पेट्रोल डिझेलचे वाटप

Ashok Kharat case : भोंदू अशोक खरात सारख्यांना मारून टाकावं आणि विषय संपवावा - संभाजी भिडे

BEL Recruitment: फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी! सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पगार १.४० लाख रुपये; अर्ज कसा करावा?

IAS-IPS Shortage: मोठी बातमी! देशात १३०० IAS तर ५०० IPS पदे रिक्त; केंद्रीय मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

मंत्री नरहरी झिरवाळ यांचा व्हिडिओ अचानक कसा बाहेर आणला गेला? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याकडून गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT