Dhurandhar Collection  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dhurandhar Collection : बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहचा बोलबाला; 'धुरंधर'नं पहिल्याच दिवशी 'सैयारा', 'पद्मावत'ला पछाडलं, कमाई किती?

Dhurandhar Box Office Collection Opening Day : रणवीर सिंहच्या 'धुरंधर' चित्रपटाने पहिल्या दिवशी छप्परफाड कमाई केली आहे. 'धुरंधर'ने मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. सिनेमाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'धुरंधर' 5 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.

'धुरंधर' चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत झळकला आहे.

'धुरंधर' ने पहिल्याच दिवशी 'सैयारा' चा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

रणवीर सिंहचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'धुरंधर' अखेर रिलीज झाला आहे. 'धुरंधर' काल (5 डिसेंबर 2025) प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्याच दिवशी 'धुरंधर'ने बक्कळ कमाई केली आहे. 'धुरंधर' चित्रपट आदित्य धर याचा आहे. कंधार अपहरण आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांसह अनेक सत्य घटनांपासून चित्रपट प्रेरित आहे. 'धुरंधर' चित्रपटात रणवीर सिंहसोबत संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, आर माधवन, राकेश बेदी हे तगडे कलाकार झळकले आहेत.

'धुरंधर' बॉक्स ऑफिस कलेक्शन

रणवीर सिंहच्या 'धुरंधर' या ॲक्शन चित्रपटाने ओपनिंग डे ला बंपर कमाई केली आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार, 'धुरंधर' ने पहिल्या दिवशी शुक्रवारी तब्बल 27 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'धुरंधर' अनेक मोठ्या चित्रपटाचे रेकॉर्ड पहिल्याच दिवशी मोडले आहेत. 'धुरंधर' चित्रपटाने अहान पांडेच्या 'सैयारा'ला मागे टाकले आहे. 'सैयारा' या रोमँटिक ड्रामाने पहिल्या दिवशी 21 कोटींची कमाई केली होती. तसेच रणवीर सिंगने स्वतःचे चित्रपट 'पद्मावत' (24 कोटी), 'सिम्बा' (20 कोटी) आणि 'गली बॉय' (19 कोटी) ला देखील मागे टाकले आहे.

'धुरंधर' रिव्ह्यू

'धुरंधर' चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना खूप आवडली आहेत. ज्यामुळे चित्रपट एका वेगळी उंचीवर गेला आहे. 'धुरंधर' चित्रपटाची संवाद संपूर्ण कथेला बांधून ठेवते. लेखकाने प्रत्येक पात्राला योग्य न्याय दिला आहे. चित्रपटातील रणवीर सिंहच्या लूकनं, स्टाइलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचा ॲक्शन अंदाज प्रेक्षकांना खूप आवडला आहे. तसेच त्याचा उत्साही स्वभावाने चित्रपटाला चारचाँद लावले आहेत. रणवीर सिंहनंतर प्रेक्षक अक्षय खन्नाच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. चित्रपटातील कलाकारांचे हावभाव प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात.

'धुरंधर' चित्रपटातील डायलॉग सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. रणवीर सिंह आणि सारा अर्जुनची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. चित्रपटात ती वेगळी चमक घेऊन येते. 'धुरंधर' चा भाग दोन देखील येणार आहे. त्यामुळे चाहते खूपच खुश आहेत. तसेच येणाऱ्या वीकेंडला 'धुरंधर' किती कोटींची कमाई करतो. हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरमध्येही महायुती तुटली; अजित पवार पक्षाची पहिली यादी जाहीर

शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला 24 तासांचा अल्टीमेटम, ऐन निवडणुकीत महायुतीमध्ये वादंग|VIDEO

अवघ्या ४ दिवसांत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ, चांदीही चकाकली; सोन्याचे दर किती रुपयांनी वाढले?

Maharashtra Live News Update: अलिबाग वडखळ मार्गावर ट्रॉफिक जाम,१० ते १५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Mumbai Tourism : ट्रेकिंग, सायकलिंग अन् बोटिंगचा मनमुराद आनंद लुटा, मुंबईत आहे 'हे' खास लोकेशन

SCROLL FOR NEXT