Shruti Vilas Kadam
सारा अर्जुन ही भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय बालकलाकार आहे. तिच्या निरागस अभिनयाने आणि नैसर्गिक भावनांमुळे ती लहान वयातच प्रेक्षकांची लाडकी बनली.
तिने तमिळ चित्रपट “Deiva Thirumagal” (2011) मधील भूमिकेने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक राष्ट्रीय स्तरावर झाले.
सारा अर्जुनने तमिळसोबतच हिंदी, तेलुगू आणि मलयाळम चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यामुळे ती बहुभाषिक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
चित्रपटांव्यतिरिक्त सारा अनेक नामांकित ब्रँडच्या जाहिरातींमध्येही दिसली आहे. तिच्या गोड एक्सप्रेशनमुळे तिला जाहिरात क्षेत्रात मोठी मागणी आहे.
लहान वयातच तिने आपल्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळवले आहेत. समीक्षकांनी तिच्या परफॉर्मन्सचे वारंवार कौतुक केले आहे.
सारा लवकरच धुरंधर या आगामी चित्रपटात रणवीर सिंगची प्रेयसी म्हणून झळकणार असून हा चित्रपटात येत्या ५ डिसैंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
सारा अर्जुन ही लहान वयातच मजबूत अभिनयाची पायाभरणी करून जात आहे. त्यामुळे ती भविष्यातील एक सक्षम, दमदार अभिनेत्री म्हणून पाहिली जाते.