Dhurandhar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dhurandhar : 'धुरंधर'साठी प्रसिद्ध अभिनेत्याला मिळाले तब्बल १ कोटी? VIDEO शेअर करत म्हणाला- "सगळे पैसे संपले..."

Vivek Sinha Talking On Dhurandhar Fees : विवेक सिन्हाने 'धुरंधर'मध्ये झहूर मिस्त्रीची भूमिका साकारली. यासाठी अभिनेत्याला १ कोटी मिळाले असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. यासंबंधित एक व्हिडीओ शेअर करून अभिनेत्याने मोठा खुलासा केला आहे.

Shreya Maskar

जगभरात 'धुरंधर २' ने धुमाकूळ घातला आहे.

'धुरंधर' फेम अभिनेता विवेक सिन्हाला १ कोटी मानधन मिळाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली.

अभिनेत्याने एक व्हिडीओ शेअर करून 'धुरंधर'च्या फी बद्दल मोठा खुलासा केला आहे.

रणवीर सिंहचा 'धुरंधर २' ने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. आदित्य धरच्या 'धुरंधर'मध्ये अपहरणकर्ता जहूर मिस्त्रीची भूमिका साकारणाऱ्या विवेक सिन्हाने चित्रपटासाठी १ कोटी रुपये घेतल्याच्या अफवांचे सोशल मीडियावर रंगल्या होत्या. आता यावर एक व्हिडीओ शेअर करून अभिनेत्याने मोठा खुलासा केला आहे. व्हिडीओत अभिनेत्याने स्पष्ट केले की, त्याला चित्रपटातील भूमिकेसाठी एक ठराविक रक्कम मिळाली होती, जी त्याच्या रोलनुसार देण्यात आली, पण ती एक कोटी नाही.चित्रपटासाठी मोठी रक्कम घेतल्याच्या बातम्या इंटरनेटवर पसरू लागल्यानंतर त्याला अनेक लोकांकडून मदतीसाठी मेसेज येऊ लागले.

विवेक सिन्हाने सर्वात आधी व्हिडीओत 'धुरंधर' ला दिलेल्या प्रेमाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले. पुढे तो म्हणाला, इंस्टाग्रामवरील काही पोस्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, "त्याला 'धुरंधर' चित्रपटासाठी ६० लाख रुपये, ८० लाख रुपये आणि अगदी १ कोटी रुपयेही देण्यात आले होते. तर भाऊ, मला एवढे पैसे मिळालेले नाहीत, शपथ. हे सगळं पसरवू नका...मला 'धुरंधर'मधून पैसा मिळाला. चांगले पैसे मिळाले. जी रक्कम ठरवली होती ती मिळाली..."

पुढे अभिनेता म्हणाला, "धुरंधर चित्रपटासाठी मला मिळालेले पैसे कधीच संपले आहे. मी खर्च केले. मी मुंबईत राहतो, भाऊ, आणि इथे खर्च खूप आहे. त्यामुळे धुरंधरचे सर्व पैसे संपले. माझ्यासाठी प्रार्थना करा की मला अशा चांगल्या मोठ्या भूमिका मिळतील. जेणेकरून माझ्याकडे भरपूर पैसा असेल आणि मला गरजू लोकांना मदत करता येईल..."

'धुरंधर' चित्रपटात विवेक सिन्हाने दहशतवाद्याची भूमिका साकारली.'धुरंधर' हा चित्रपट ५ डिसेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर १३०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली होती. दुसरीकडे, 'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे. आतापर्यंत, या चित्रपटाने जगभरातील कमाईचा १६०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT