Dhurandhar 
मनोरंजन बातम्या

Dhurandhar: 'मला वाटलं माझं पात्र...'; धुरंधरमुळे अक्षय खन्नाला प्रसिद्धी मिळाल्याने आर. माधवन नाराज?

Dhurandhar: 'धुरंधर'२०२५ चा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. चित्रपटातील अक्षय खन्नाच्या अभिनयाने रणवीर सिंग, आर. माधवन, संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांना मागे टाकले आहे.

Shruti Vilas Kadam

Dhurandhar: आदित्य धर यांचा स्पाय थ्रिलर "धुरंधर" हा चित्रपट दररोज बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट एकामागून एक रेकॉर्ड ब्रेक करत आहे. चित्रपटाची कथा आणि त्यातील सर्व पात्रांनी चाहत्यांची मने जिंकले आहेत. पण, रहमान डकैत या व्यक्तिरेखेने सर्वात जास्त प्रेक्षकांना वेड लावले आहे.

"धुरंधर" मध्ये रहमान डकैत या व्यक्तिरेखेने चित्रपटातील इतर सर्वांना मागे टाकले आहे. हमजा किंवा अजय सन्याल दोघांबद्दलही जास्त चर्चा होत नाहीये. फक्त अक्षय खन्नाचे नाव सर्वांच्या ओठांवर आहे. अलिकडेच आर. माधवनने "धुरंधर" मध्ये अक्षय खन्नाने केलेल्या या ओवरशॅडोवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

"धुरंधर" लाइमलाइट काढून घेतल्याने माधवन नाराज आहे का?

अलीकडेच सोशल मीडिया नेटकऱ्यांना असे वाटले की आर. माधवन अक्षयचे नाव सतत घेतले असल्याने थोडे नाराज होते, याबद्दल माधवनला विचारण्यात आले होते. बॉलीवूड हंगामाला दिलेल्या एका खास मुलाखतीत आर. माधवन म्हणाले, "अजिबात नाही, खरं तर, मी अक्षयसाठी यापेक्षा जास्त आनंदी असू शकत नाही. त्याला मिळत असलेल्या कौतुकाचा तो पूर्णपणे हक्कदार आहे."

अक्षयचे कौतुक करताना माधवनने त्याला एक प्रतिभावान आणि स्थिर स्टार म्हणाला, "जर त्याला पाहिजे असेल तर तो सहजपणे लाखो मुलाखती देऊ शकतो, पण त्याला शांतता फार आवडते. धुरंधर' चित्रपट लोकांना आवडायला लागला तेव्हा मला वाटलं माझं पात्र थोड अंडरडॉग आहे, परंतु अक्षय खन्ना वेगळाच कलाकार आहे. त्याला यश असो वा अपयश, त्याच्यासाठी सर्व काही सारखेच आहे."

आर. माधवनने स्पष्ट केले की अक्षय किंवा आदित्य धर या दोघांनाही चित्रपटाच्या यशाचे श्रेय घेण्यात रस नाही. सहा देशांमध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे, परंतु याचा त्याच्या कमाईवर कोणताही परिणाम झालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhendi Facepack : नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी लावा भेंडीचा फेस पॅक

Relationship Tips: नवरा बायकोचं लग्नानंतर बोलणं कमी झालंय? 'या' टिप्स करा फॉलो, नातं होईल घट्ट

Bhakri Making Tips : भाकरी थापताना तुटते? टेन्शन घेऊ नका, फक्त 'या' सोप्या टिप्स वापरा

लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट, 2100 नाहीतर 4500 मिळणार|VIDEO

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये EVM आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आयडी कार्ड, शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

SCROLL FOR NEXT