Dhurandhar 3 saam tv
मनोरंजन बातम्या

Dhurandhar 3 : आता 'धुरंधर 3' थिएटरमध्ये धुमाकूळ घालणार; रणवीर सिंहच्या सिनेमाचा तिसरा पार्ट येणार? नेमकं सत्य काय?

Dhurandhar 3 Release Date : रणवीर सिंहचा 'धुरंधर २' थिएटरमध्ये धुमाकूळ घालत असताना 'धुरंधर 3' चित्रपटासंबंधित मोठे अपडेट समोर आले आहे. 'धुरंधर 3'ची रिलीज डेट समोर आली आहे. नेमकं सत्य काय? जाणून घेऊयात.

Shreya Maskar

थिएटरमध्ये 'धुरंधर २' धुमाकूळ घालत आहे.

'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट 19 मार्च 2026 ला प्रदर्शित झाला आहे.

आता सोशल मीडियावर 'धुरंधर ३' ची चर्चा रंगली आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहच्या 'धुरंधर २' चा बोलबाला पाहायला मिळत आहे. चित्रपटाने जगभरात ७०० कोटींचा टप्पा पार केला आहे. थिएटरमध्ये चित्रपट पाहायला गेलेले लोक आता 'धुरंधर ३' ची चर्चा करताना दिसत आहे. 'धुरंधर ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे बोले जात आहे.

आदित्य धर जून महिन्यात 'धुरंधर ३' प्रदर्शित करणार असल्याचे बोले जात आहे. 'धुरंधर २' प्रदर्शित झाला तेव्हा आदित्य धरने प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यानंतर 'धुरंधर २' एंड क्रेडिट्स संपेपर्यंत थांबण्याचे आवाहन केले होते. तो म्हणाला होता, "जोपर्यंत क्रेडिट्स थांबत नाहीत, तोपर्यंत तुमच्या जागेवरून उठू नका." जेव्हा 'धुरंधर २' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा त्याचे काही एंड क्रेडिट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या पोस्ट्समध्ये असे दिसत आहे की, "धुरंधर द फाइनल चाप्टर १४ जून, २०२६"

'धुरंधर २' एंड क्रेडिट्समध्ये 'धुरंधर ३' ची घोषणा केल्याचे बोले जात आहे. मात्र हे असत्य आहे. आदित्य धरने एंड क्रेडिट्समध्ये धुरंधर ३ ची घोषणा केली नाही. त्याने एंड क्रेडिट्समध्ये काही दृश्ये दाखवली आहेत, त्यापैकी एका दृश्यात रणवीर सिंह हमजा बनण्यासाठी प्रशिक्षण घेत असल्याचे दिसते.अद्याप दिग्दर्शक आदित्य धर यांनी 'धुरंधर ३' विषयी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. त्यामुळे, असे बोले जात आहे की, ही व्हायरल पोस्ट एआय-निर्मित असून चित्रपटाची चर्चा वाढवण्यासाठी ती शेअर केली जात आहे.

'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट 19 मार्च 2026 ला प्रदर्शित झाला आहे. 'धुरंधर 2'मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असून त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 'धुरंधर 2'च्या कथेत रहमान डकैतच्या मृत्यूनंतर पुढे काय घडते, हे दाखवण्यात आले आहे. चित्रपट दिवसेंदिवस बक्कळ कमाई करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: चंद्रपूर-गडचिरोलीला पावसाचा रेड अलर्ट; सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी

MH-CETमध्ये पर्सेंटाईल घोटाळा? 40% मिळवणाऱ्याला 100 पर्सेंटाईल, 13 लाखांत हवं ते कॉलेज देण्याची हमी

Maharashtra News Live Update: केसनंद ग्रामपंचायतीसमोर कचरा आंदोलन कथित भ्रष्टाचाराविरोधात अनोखा निषेध

बॉयफ्रेंडसोबत बोलताना रडायचा मुलगा; निर्दयी मायनं ३ वर्षाच्या लेकाचा दाबला गळा

Abhijeet Dipke : ...तर लवकरच मोठं आंदोलन; अभिजीत दिपकेंचा सरकारला गंभीर इशारा

SCROLL FOR NEXT