Dhurandhar 2 saam tv
मनोरंजन बातम्या

Dhurandhar 2 : 'धुरंधर २'च्या यशात मिठाचा खडा; आदित्य धरवर चोरीचा आरोप, कायदेशीर कारवाईची धमकी

Dhurandhar The Revenge- Script Copy Controversy : रणवीर सिंगचा चित्रपट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आदित्य धरवर चोरीचा आरोप करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

रणवीर सिंहचा 'धुरंधर २' चित्रपट पुन्हा एकदा वादात सापडला आहे.

'धुरंधर २' च्या निर्मात्यांवर चोरीचा आरोप करण्यात आला आहे.

'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट 19 मार्च 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

रणवीर सिंगचा 'धुरंधर २' सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपटाने भारतात ९०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला असून जगभरात १,५०० कोटी रुपयांचा टप्पा लवकरच गाठण्यावर आहे. मात्र आता हा चित्रपट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सुरूवातीपासून हा चित्रपट कायदेशीर अडचणीत आहे. आता चित्रपटाच्या निर्मात्यावर कथेच्या चोरीचे आरोप करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि लेखक संतोष कुमार आर.एस. यांनी दावा केला आहे की, 'धुरंधर २' ची पटकथा त्यांच्या ऑरिजनल कामातून कॉपी केली आहे. संतोष यांच्या म्हणण्यांनुसार चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, चित्रपटाची कथा आणि मुख्य घटक हे त्यांनी २०२३ मध्ये लिहिलेल्या पटकथेसारखेच आहेत. त्यांनी आता या प्रकरणी निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे.

संतोष कुमार आर.एस. यांनी ही पटकथा अनेक मोठ्या प्रोडक्शन हाऊसेसकडे नेली होती. माध्यमांशी बोलताना संतोष कुमार आर.एस. यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या कथेवर खूप मेहनत घेतली होती आणि नोव्हेंबर २०२३ मध्ये स्क्रीनरायटर्स असोसिएशनकडे तिची अधिकृतपणे नोंदणी केली होती. त्यांचा दावा आहे की, त्यांनी आपली पटकथा सोनी पिक्चर्स, झी स्टुडिओ, टी-सिरीज आणि धर्मा प्रोडक्शन्स यांसारख्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसेसकडे नेली होती. संतोषने पुढे सांगितले की, त्याला या प्रोजेक्टमध्ये आदित्य रॉय कपूरला मुख्य भूमिकेत घ्यायचे होते आणि त्याने आपली संकल्पना अनेक मोठ्या स्टुडिओंसोबत शेअर केली होती. त्याच्याकडे पुरावा म्हणून ईमेल आणि इतर कागदपत्रेही आहेत.

लेखक संतोष कुमार यांनी निराशा व्यक्त करत आरोप केला की, त्याच्या कथेचा गैरवापर करण्यात आला आहे. त्याच्या कथेची मूळ कल्पना बदलून तिला राजकीय प्रचारात बदलण्यात आले आहे, संतोष कुमार यांचा हेतू केवळ एक मनोरंजक चित्रपट बनवण्याचा होता. संतोष म्हणतो की, त्याचा लढा वैयक्तिक नाही, तर तो त्या संघर्षशील लेखकांसाठी आवाज उठवत आहे, जे लहान शहरांमधून मोठी स्वप्ने घेऊन बॉलिवूडमध्ये येतात, परंतु पाठिंब्याच्या अभावामुळे त्यांचा विश्वासघात होतो.

'धुरंधर २' चे निर्माते आणि दिग्दर्शक आदित्य धर यांच्याकडून या प्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. दुसरीकडे, संतोष कुमारने स्पष्ट केले आहे की, हे प्रकरण ते कायदेशीर मार्गाने हाताळतील. या सर्वाचा 'धुरंधर २'च्या यशावर कसा परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता लवकरच 'धुरंधर' हा पहिला भाग टिव्हीवर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : ५ रुपयांची बॉटल १० रुपयांना, पाण्याच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांची लूट; बोरिवली स्थानकावरील धक्कादायक प्रकार

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रकला धडक; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Hair Fall Control Drink: केसगळती थांबवण्यासाठी कढीपत्ता- आवळा ड्रिंक ठरेल बेस्ट, कधी प्यावे? जाणून घ्या

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला? हॉटेलमध्ये अंदाधुंद गोळीबार, सीक्रेट सर्व्हिसने कसा वाचवला जीव? VIDEO

Fort Near Lohagad : लोहगडजवळ लपलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला, भव्यता पाहून डोळे दिपतील

SCROLL FOR NEXT