Shruti Vilas Kadam
अभिनेत्री सारा अर्जुन ‘धुरंधर २’मधील कामामुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले आहे.
चित्रपटात रणवीर सिंग सोबतची तिची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. यामुळे तिची लोकप्रियता आणखी वाढली.
चित्रपटाच्या यशानंतर सारा अर्जुनच्या हातात आणखी एक मोठा प्रोजेक्ट आल्याची माहिती समोर आली आहे.
जोया अख्तरच्या ‘टायगर बेबी’ या बॅनरखाली बनणाऱ्या नव्या चित्रपटासाठी सारा अर्जुनची निवड झाली आहे.
या चित्रपटात सारा अर्जुन ईशान खट्टरसोबत झळकण्याची शक्यता असून, ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरू शकते.
या प्रोजेक्टचे दिग्दर्शन अर्जुन वरेन सिंग करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सारा अर्जुन आणि ईशान खट्टरने एक व्हिडीओ तिच्या सोशल मीडीयावर पोस्ट केल्यापासून या चर्चेची सुरुवात झाली आहे. या चित्रपटाची छोटी झलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.