The Kerala Story Film Review
The Kerala Story Film ReviewInstagram @sunshinepicturesofficial

The Kerala Story Review: सत्य कथेवर आधारित असलेल्या ‘द केरळ स्टोरी’चा Review; असा आहे चित्रपट...

चित्रपटाचे निर्माते सुदिप्तो सेन असून चित्रपटाचे दिग्दर्शक विपुल शाह आहेत, सोबतच अदा शर्मा, सोनिया बेलानीसह योगिता बिहानी यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. चित्रपटात दाखवण्यात आलेली हृदय पिळवटून टाकणारी कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडते.
Published on
The Kerala Story Review(2.5 / 5)

The Kerala Story Review: ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट आजपासून अर्थात ५ मे पासून थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते सुदिप्तो सेन असून चित्रपटाचे दिग्दर्शक विपुल शाह आहेत, यांनी सांगितलेली हृदय पिळवटून टाकणारी कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडते. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अदा शर्मा, सोनिया बेलानीसह योगिता बिहानी दिसत आहेत. चला तर जाणून घेऊया, ‘द केरळ स्टोरी’चा रिव्ह्यू...

चित्रपटाच्या कथेची सुरुवात शालिनी उन्नीकृष्णन हिच्यापासून सुरू होते, तिला अफगाण सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले असून तिला दहशतवादी म्हणून तिची गणना केली जात आहे. शालिनी वारंवार ती पीडित असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नाही. मग शालिनीची गोष्ट फ्लॅशबॅकमध्ये सुरू होते. कोची येथील शालिनी कासारगोड येथील नर्सिंग स्कूलमध्ये ती शिकण्यासाठी जाते, त्यावेळी तिला नीमा, गीतांजली आणि असिफा या तिच्या सहकारी तिला भेटतात. (Bollywood)

The Kerala Story Film Review
Punjabi Singer Kanwar Chahal Died: पंजाबी संगीत क्षेत्रावर शोककळा; गायक कंवर चहलचे निधन

मनोरंजक कथा

एका टेक्निकल आणि प्रोफेशनल प्रशिक्षणांतर्गत, इस्लाम हा सर्वोत्तम धर्म कसा आहे आणि प्रत्येकाने तो कसा स्वीकारला पाहिजे, याची कल्पना मांडून असिफा नर्सिंग स्कूलमध्ये असलेल्या तिच्या तीन खास मैत्रिणींचे ब्रेनवॉश करते. केरळमधील या मुली आसिफाच्या जाळ्यात कसे अडकतात, गर्भवती झाल्यानंतर या मुलींना परदेशात कसे पाठवले जाते, या तिन्ही तरूणींना आणि त्यांच्या कुटुंबियांना कशा प्रकारे समोर येत असलेल्या अडचणींचा सामना करावा लागतो, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. केरळमध्ये राहणाऱ्या एका हिंदू कुटुंबियातील मुलगी शालिनी उन्नीकृष्णन हिला धर्मांतराच्या जाळ्यात कसे अडकवले जाते आणि ISIS दहशतवादी बनवले जाते, ही सर्व स्टोरी आपल्याला चित्रपटात दिसते. (Bollywood Film)

The Kerala Story Film Review
Phakaat Trailer Out: भारत-पाकिस्तानच्या संघर्षाला विनोदाचा तडका: 'फकाट'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

नेमका कसा आहे, चित्रपट...

देशातील सर्वात जास्त साक्षर नागरिक असलेल्या राज्याची भीषण भयावह कथा निर्माता सुदिप्तोने चतुराईने मांडले आहे. चित्रपटाची कथाच प्रेक्षकांना अस्वस्थ करतो. सर्व धर्मातील निरपराध महिलांना कधी प्रेमाने तर कधी धमक्या देऊन कसे इस्लाम धर्मात धर्मांतरित केले जाते हे दाखवले आहे, त्यावेळी चित्रपटात दाखवलेली वेदना प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचते. ‘द केरळ स्टोरी’सारखा विषय मोठ्या पडद्यावर मांडणं सोप्प नाही, पण चित्रपटात सुदीप्तो वेगळेपणं दाखवण्यात यशस्वी झाला आहे. लेखकाने संवाद खूपच भारदस्त लिहिले आहेत. अनेक डायलॉग्स प्रेक्षकांना हादरवून सोडतात. (Bollywood Actress)

अभिनय आणि म्यूझिक

अदा नेहमीच युनिक चित्रपटांसाठी ओळखली जाते. जरी या चित्रपटात अदाने उत्कृष्ट अभिनय केला असून तिने चित्रपटात दाक्षिणात्य भाषेचा योग्य पद्धतीने वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. अदासह योगिता आणि सोनियाची व्यक्तिरेखा आपण कधीच विसरू शकत नाही. या चित्रपटातील इतर कलाकारांनीही त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटात संगीत आणि पार्श्वसंगीताचा योग्य वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.

The Kerala Story Film Review
Dahaad Trailer Release: सोनाक्षीची 'दबंगगिरी', अखेर त्या २७ महिलांच्या मृत्यूचं गूढ उलगडणार

चित्रपट का पहावा...

केरळसारख्या साक्षर शहरात ब्रेन वॉश करून धर्मांतर करणे अशक्य वाटते. याला काही लॉजिक नाही असेही तुम्हला वाटेल. तुम्हाला हिंसा बघायला आवडत नसेल तर हा चित्रपट तुमच्यासाठी नाही. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचा निर्मात्यांचा दावा आहे. चित्रपटाच्या शेवटी त्यांनी काही पुरावे दिले आहेत आणि त्यांची कथा खरी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

कॉन्ट्रोव्हर्सी आणि सत्यता

केरळमधून 30000 हून अधिक मुली बेपत्ता झाल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. निर्माते त्यांच्या दाव्यावर ठाम आहे. चित्रपटामध्ये ज्या तीन मुलींची कथा दाखविण्यात आली आहे, त्यांचे व्हिडिओ त्यांची ओळख न दाखवता चित्रपटाच्या शेवटी प्रेक्षकांसमोर सादर केले आहेत. चित्रपटासाठी डेटा गोळा करत असताना हे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com