Dahaad Trailer Release: सोनाक्षीची 'दबंगगिरी', अखेर त्या २७ महिलांच्या मृत्यूचं गूढ उलगडणार

Sonakshi Sinha New Movie: बॉलिवूडची दबंग गर्ल अशी ओळख असलेली सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा 'दबंगगिरी' करण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या सोनाक्षी तिच्या आगामी वेबसीरिजमुळे चर्चेत आहे.
Dahaad Trailer Release
Dahaad Trailer ReleaseSaam Tv

Bollywood Actress Sonakshi Sinha: बॉलिवूडची दबंग गर्ल अशी ओळख असलेली सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा 'दबंगगिरी' करण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या सोनाक्षी तिच्या आगामी वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. सोनाक्षीची 'दहाड' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या माध्यमातून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Dahaad Trailer Release
Swapnil Mayekar Dies At The Age 46: चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच दिग्दर्शक हरपला, स्वप्नील मयेकर यांचे निधन

सीरिजमध्ये सोनाक्षी २७ मृत महिलेच्या गुन्ह्याचा कोडं सोडवताना दिसत आहे. ज्यामध्ये २७ महिलांची संशयास्पद हत्या झाली आहे. ट्रेलरच्या सुरूवातीलाच, सोनाक्षी सिन्हा "कृष्णा माझी बहिण" म्हणणाऱ्या एका व्यक्तीला फोटो दाखवते,वय विचारणार तेवढ्यातच, आणखी एक व्यक्ती आपली बहीण सहा महिन्यांपासून बेपत्ता असल्याची माहिती देतो, यानंतर तब्बल २७ महिला बेपत्ता असल्याच्या तक्रारी सोनाक्षीकडे येतात ज्याचं प्रकरण हे एकच आहे. (Latest Entertainment News)

Dahaad Trailer Release
Chowk Marathi Movie Trailer Release: आरारा खतरनाक..! 'चौक'चा ट्रेलर वाजणार, सिनेमा महाराष्ट्रात गाजणार.. थरारक ट्रेलर भेटीला

महिला पोलिसांच्या भूमिकेत सोनाक्षी या २७ मृत महिलांचे गूढ उकलण्यासाठी मेहनत घेताना दिसते आहे. या सर्व हत्यांची कोणीही तक्रार केली नाही व कोणाही साक्षीदार नसल्याने हे प्रकरण समोर आले आहे. यादरम्यान, या सर्व गुन्ह्यांच्या विरोधात एक महिला पोलीस अधिकारी अंजली भाटी सक्षमपणे उभी आहे. जी या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेऊन त्या सर्व महिलांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी घेते.

पोलिसांच्या भूमिकेत सोनाक्षी सिन्हा धाडसी व्यक्तिरेखा साकारत आहे. वेबसीरिज फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटने रिलीज केली असून रीमा कागती आणि झोया अख्तर यांच्या प्रोडक्शनाखाली आहे. रीमा कागती आणि रुचिका ओबेरॉय या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हासह अभिनेता विजय वर्मा, गुलशन देवय्या हे देखील मुख्य भूमिकेत आहेत.

Dahaad Trailer Release
Parineeti Chopra-Raghav Chadha In IPL: IPL च्या मुंबई-पंजाबच्या सामन्यात 'परिणीती भाभी जिंदाबाद'चा नारा, दुमदुमले मोहाली स्टेडियम

सुरुवातीला आत्महत्या वाटणारी ही घटना सीरियल किलरच्या शिकार असल्याचे समजताच अंजली या प्रकरणाचा शोध कसा लावते आहे? हे या दहाड मध्ये पाहता येणार आहे, दहाड ही वेबसीरिज ८ भागांची असून एक क्राईम ड्रामा आहे. वेबसीरिज १२ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com