Dhurandhar 2 Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dhurandhar 2 Collection : २१ व्या दिवशी 'धुरंधर २'ची जादू फेल; चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण, बुधवारी किती केले कलेक्शन?

Dhurandhar The Revenge Box Office Collection Day 21 : 'धुरंधर २' चा आता तिसरा आठवडा सुरू आहे. रिलीजनंतर पहिल्यांदाच 'धुरंधर २' च्या कमाईत घसरण झाली आहे. चित्रपटाने किती कमावले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट 19 मार्च 2026 ला रिलीज झाला आहे.

'धुरंधर: द रिव्हेंज' मध्ये मुख्य भूमिकेत रणवीर सिंह झळकला आहे, जो चित्रपटात गुप्तहेर आहे.

तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे.

'धुरंधर २' ची जादू बॉक्स ऑफिसवर फेल होताना दिसत आहे. रणवीर सिंहच्या चित्रपटाने २१ व्या दिवसी सर्वात कमी कलेक्शन आहे. आदित्य धरच्या 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे. 'धुरंधर २' चित्रपट 19 मार्च 2026 ला प्रदर्शित झाला. सध्या या चित्रपटाचा तिसरा आठवडा सुरू आहे. 'धुरंधर 2' चित्रपटाची कथा भारताचा गुप्तहेर असलेल्या आणि पूर्वी 'जसकीरत सिंह रंगी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हमझा अली माझारीच्या प्रवासाची आहे. चित्रपटाने तिसऱ्या बुधवारी किती कमावले. जाणून घेऊयात.

'धुरंधर २' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस २१

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपटाने रिलीजच्या २१ व्या दिवशी म्हणजे तिसऱ्या बुधवारी जवळपास ७.९० कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाची एकूण ग्रॉस कमाई अंदाजे ९.४६ कोटी रुपये इतकी झाली आहे. रणवीर सिंहच्या 'धुरंधर २' चित्रपटाच्या कमाईत घसरण होताना दिसत आहे. 'धुरंधर २' ने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच आठवड्यात ६७४.१७ कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात २६३.६५ कोटी कमावले. आता तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाने १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून, त्याची सध्याची एकूण कमाई सुमारे १०३.४५ कोटी रुपयांच्या घरात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, २१ व्या दिवशी 'धुरंधर २' ची कमाई त्याच्या आधीच्या भागाच्या म्हणजेच 'धुरंधर' च्या कमाईपेक्षा कमी झाली आहे. जिथे 'धुरंधर २' ने २१ व्या दिवशी ७.९० कोटी रुपये कमावले. तिथे 'धुरंधर' ने २५ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली होती. आता येणाऱ्या वींकेडला 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट किती कोटींची कमाई करतो. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

'धुरंधर २' चित्रपटाने भारतात १,०४१.२७ कोटी रुपयांची एकूण नेट कमाई केली आहे. यामुळे हा चित्रपट देशातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. तसेच पहिलाच बॉलिवूड चित्रपट बनला आहे. या चित्रपटाची जगभरातील एकूण ग्रॉस कमाई १,६५३.६७ कोटी रुपये इतकी आहे. ज्यामध्ये भारतातील ग्रॉस कमाईचा अंदाज १,२४६.६७ कोटी रुपये आणि परदेशातील कमाईचा अंदाज सुमारे ४०७ कोटी रुपये इतका वर्तवण्यात आला आहे.

'धुरंधर 2' ने 'बाहुबली 2'चा विक्रम मोडला

'धुरंधर २' ने 'बाहुबली २: द कन्क्लुजन' चित्रपटाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या 'बाहुबली २ ' चित्रपटाने भारतात (net collection) सुमारे १,०३० ते १,०३३ कोटी रुपयांची एकूण कमाई केली होती. याउलट, 'धुरंधर २' ने बॉक्स ऑफिसवर अंदाजे १,०४१.२७ कोटी रुपयांची नेट कमाई केली. मीडिया रिपोर्टनुसार 'धुरंधर २' तिसऱ्या बुधवारी सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे.

  • धुरंधर: २०.९० कोटी

  • पुष्पा २: १९.५ कोटी

  • बाहुबली २: १२ कोटी

  • धुरंधर २: ७.९० कोटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! १५ टक्के पाणीकपात होणार, धरणांमधील पाणीसाठ्यात घट

मध्य रेल्वेकडून ५ तासांचा विशेष ब्लॉक, वेळापत्रकात मोठा बदल, कोणत्या गाड्यांवर परिणाम होणार?

Yerwada Mental Hospital: येरवडा मनोरुग्णालय की छळछावणी? मनोरुग्णांना जुंपलं सफाईला

PM Kisan Mandhan Yojana: खुशखबर! शेतकऱ्यांना दर महिन्याला मिळणार ₹३०००; पीएम किसान मानधन योजना आहे तरी काय?

Maharashtra News Live Update: अमरावतीमध्ये टेम्पोचा ओव्हरटेक करताना अपघात, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT