Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; वयाच्या ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजन विश्वावर शोककळा

Famous Actor Passes Away : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे. त्याच्या बायकोने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही दुःखद बातमी सांगितली आहे.
Famous Actor Passes Away
Famous Actor DeathSAAM TV
Published On
Summary

प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले.

अभिनेत्याने वयाच्या ३५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

बायकोने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून नवऱ्याच्या निधनाची माहिती दिली आहे.

'गेम ऑफ थ्रोन्स' या गाजलेल्या ड्रामामधील भूमिकेसाठी ओळखले जाणारे अभिनेते मायकल पॅट्रिक (Michael Patrick ) यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मोटर न्यूरॉन डिसीज (Motor neuron disease - MND) या आजाराशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर त्यांचे निधन झाले. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांना या आजाराचे निदान झाले होते. मोटर न्यूरॉन डिसीज (MND) हा दुर्मिळ, प्रगतीशील न्यूरोडीजनरेटिव्ह विकारांचा एक समूह आहे, ज्यामध्ये मोटर न्यूरॉन्स नष्ट होतात, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात, पक्षाघात होतो आणि बोलणे, गिळणे व श्वास घेणे यांमध्ये गंभीर अडथळा निर्माण होतो.

मायकल पॅट्रिक यांची बायको नाओमी शीहान (naomi sheehan) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला. त्यांनी लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे, ज्याला भावुक कॅप्शन लिहून श्रद्धांजली वाहिली आहे. मायकल पॅट्रिक 'गेम ऑफ थ्रोन्स'मधील भूमिकेव्यतिरिक्त, पॅट्रिक 'ब्लू लाइट्स' आणि 'दिस टाऊन' यांसारख्या अनेक टिव्ही मालिकांमध्ये दिसला. अभिनेत्याच्या निधनाची बातमी समजताच कलाकारांनी आणि चाहत्यांनी अभिनेत्यावर श्रद्धांजली वाहिली आहे.

नाओमी शीहान यांची पोस्ट

"काल रात्री, नॉर्दर्न आयर्लंड हॉस्पिसमध्ये मिकचे दुःखद निधन झाले.

१ फेब्रुवारी २०२३ रोजी त्याला 'मोटर न्यूरॉन डिसीज' (Motor Neurone Disease) झाल्याचे निदान झाले होते.

दहा दिवसांपूर्वी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याची त्याची मनापासून काळजी घेतली गेली. आपल्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवाराच्या सानिध्यात अत्यंत शांतपणे त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याने आयुष्याचा प्रत्येक दिवस मनापासून जगला आहे. आनंद, उत्स्फूर्त उत्साह आणि इतरांनाही हसवायला लावणारा त्याचा खळखळता हास्यविनोद असे त्याचे व्यक्तिमत्त्व होते. तांबड्या केसांचा, एखाद्या महाकाय योद्ध्यासारखा कणखर माणूस!

गेल्या काही वर्षांत ज्या ज्या व्यक्तींनी आम्हाला आधार दिला, त्या प्रत्येकाचे आम्ही मनापासून ऋणी आहोत.

मिकला ब्रेंडन बेहन यांचे हे वचन खूप आवडत असे आणि आजच्या या प्रसंगी ते अत्यंत समर्पक वाटते - "या जगात करण्यासारख्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे काहीतरी खायला मिळणे, काहीतरी प्यायला मिळणे आणि तुमच्यावर प्रेम करणारी एखादी व्यक्ती असणे."

त्यामुळे, याचा फारसा गुंतागुंतीने विचार करू नका.

खा, प्या, आणि प्रेम करा.

नाओमी - मिकची पत्नी"

Famous Actor Passes Away
Dhurandhar 2 OTT : आता थिएटरमध्ये नाही तर घरबसल्या बघा 'धुरंधर २', ओटीटीवर कुठे अन् कधी पाहता येणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com