Dhurandhar 2 Collection  saam tv
मनोरंजन बातम्या

Dhurandhar 2 Collection : 'धुरंधर २' ची यशस्वी घोडदौड, सलग तिसऱ्या सोमवारी छप्परफाड कमाई; वर्ल्डवाइड कलेक्शन 1,600 कोटींपार

Dhurandhar The Revenge- Box Office Collection Day 19 : रणवीर सिंहचा 'धुरंधर २' चित्रपट जगभरात गाजत आहे. चित्रपटाने 1,600 कोटी पार कमाई केली आहे. तिसऱ्या सोमवारचे कलेक्शन वाचा.

Shreya Maskar

'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट 19 मार्च 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

रणवीर सिंहच्या 'धुरंधर २'ने जगभरात 1,600 कोटींपार कमाई केली आहे.

सर्वत्र आदित्य धरचे कौतुक पाहायला मिळत आहे.

'धुरंधर २' रिलीज होऊन आता २ आठवडे झाले आहेत. तिसऱ्या सोमवारी देखील आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट थिएटरमध्ये हाऊसफुल पाहायला मिळत आहे. 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट 19 मार्च 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'धुरंधर २' मधील संवाद, ॲक्शन आणि गाणी सर्वच कौतुकास्पद आहे. 'धुरंधर २'ने जगभरात बक्कळ पैसा कमावला आहे.

'धुरंधर: द रिव्हेंज' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १९

रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असलेला 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे. चित्रपटाचा तिसरा आठवडा सुरू आहे. या चित्रपटाने देशांतर्गत बाजारपेठेत १,००० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये प्रवेश केला असून, जगभरात १,६०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, तिसऱ्या सोमवारी 'धुरंधर २'ने १० कोटी रुपयांची कमाई केली. १८ व्या दिवसाच्या कामगिरीच्या तुलनेत कमाईत घसरण झाली आहे. सोमवारी 'धुरंधर २' चे एकूण (नेट) कलेक्शन १,०२३.७७ कोटी रुपयांवर पोहोचले.

जगभरातील कमाईचा विचार करता, परदेशातून ३९७ कोटी रुपये आणि भारतातून १,२२५.७२ कोटी रुपयांचा व्यवसाय करून, या चित्रपटाच्या एकूण कमाईचा आकडा १,६२२.७२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.१९ व्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या यादीत 'धुरांधर' अव्वल स्थानी आहे. या चित्रपटाने एकूण १७.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. १२.६० कोटी रुपयांसह 'पठाण' या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' चित्रपट १०.५० कोटी रुपयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.'धुरंधर २' ने १००० कोटींमध्ये एन्ट्री करून मोठा इतिहास रचला आहे. असे करणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

'धुरंधर' चित्रपट

डिसेंबर 2025 पासून सर्वत्र फक्त 'धुरंधर', आदित्य धर, रणवीर सिंह यांच्या चर्चा पाहायला मिळत आहे. आदित्य धरने संपूर्ण मार्केट व्यापले आहे. त्याच्या चित्रपटाची तुफान चर्चा रंगली आहे. 'धुरंधर 2' चित्रपटाची कथा भारताचा गुप्तहेर असलेल्या आणि पूर्वी 'जसकीरत सिंह रंगी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हमझा अली माझारीच्या प्रवासाची आहे. 'धुरंधर' 5 डिसेंबर 2025 रिलीज झाला होता. 'धुरंधर' मध्ये रणवीर सिंगसोबत सारा अर्जुन, सारा अर्जुन, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना हे कलाकार झळकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabestes Control And Liver Detox Drink: कारले की कडुनिंब? कोणता रस लिव्हर, ब्लड शुगर आणि स्किनसाठी सर्वात बेस्ट?

दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए! महिलांचे लैंगिक शोषण कसे केले? खरात बाबाने सर्वच सांगितलं; SIT तपासातून धक्कादायक माहिती समोर

Accident News : अमरावतीत भीषण अपघात! भरधाव कारने दुचाकीला उडवलं, तिघांचा जागीच मृत्यू

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्याची घोषणा लवकरच; पगार कितीने वाढणार; वाचा सविस्तर

Maharashtra News Live Update: नाशिकमधील वृक्षतोडी प्रकरणी आज राष्ट्रीय हरित लवादासमोर सुनावणी

SCROLL FOR NEXT