Dhurandhar 2  Saam tv
मनोरंजन बातम्या

Dhurandhar 2 Collection: तिसऱ्या शनिवारी, 'धुरंधर २' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; केली इतक्या कोट्यवधींची कमाई

Dhurandhar 2 Collection: 'धुरंधर २' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने आपल्या तिसऱ्या शनिवारीही दमदार कमाई केली आहे. चला, या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसची कमाई जाणून घेऊयात.

Shruti Vilas Kadam

Dhurandhar 2 Collection: १९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करत असून ही घोडदौड कायम सुरु आहे. आठवड्याचे दिवस असो किंवा शनिवार-रविवार, या चित्रपटाच्या कमाईत कोणतीही घट दिसत नाही. उलट प्रत्येक दिवशी चित्रपट नवे रेकॉर्ड ब्रेक करत आहेत.

‘सॅकनिल्क’च्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्याच दिवशी सुमारे १०२ कोटींची दमदार ओपनिंग केली. त्यानंतर सलग काही दिवस चित्रपटाने जवळपास १०० कोटींची कमाई कायम ठेवत बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवले. विशेष म्हणजे, १६व्या दिवशीही चित्रपटाने २१.५५ कोटींची भर घालत आपली पकड मजबूत ठेवली आहे.

या कमाईसह भारतातील 'धुरंधर २'ची एकूण नेट कमाई ९५९.३७ कोटींवर पोहोचली आहे, तर ग्रॉस कमाई १,१४८.५८ कोटी इतकी झाली आहे. जागतिक स्तरावर पाहता, या चित्रपटाने तब्बल १,५२३.५८ कोटींची कमाई करत मोठा टप्पा पार केला आहे.

दरम्यान, १७ एप्रिल रोजी भूत बंगला प्रदर्शित होईपर्यंत कोणताही मोठा चित्रपट रिलीज होणार नसल्याने, या कालावधीत धुरंधर २ची चित्रपटगृहांवर कमाई चांगली होईल. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या ॲक्शन-थ्रिलरमध्ये रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन यांसारख्या दमदार कलाकारांच्या भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

SCROLL FOR NEXT