Dhurandhar 2 Collection saam tv
मनोरंजन बातम्या

Dhurandhar 2 Collection : रणवीर सिंह अन् अल्लू अर्जुन यांच्यात कांटे की टक्कर; 'धुरंधर २' नंबर १ पासून काही पावले दूर, 'पुष्पा २'लाही पछाडणार

Dhurandhar 2 Box Office Collection Day 20 : रणवीर सिंहचा 'धुरंधर २' चित्रपट बक्कळ पैसा कमावत आहे. 'धुरंधर २' ने अनेक चित्रपटाचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. आता 'धुरंधर २'च्या निशाण्यावर अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' चित्रपट आहे.

Shreya Maskar

'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट 19 मार्च 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'धुरंधर २' आणि 'पुष्पा २'मध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

'धुरंधर २' चित्रपट आदित्य धर दिग्दर्शित आहे.

रणवीर सिंहचा 'धुरंधर २' रोज नवीन रेकॉर्ड ब्रेक करत आहे. रिलीजपासून या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. रणवीर सिंग, राकेश बेदी, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर माधवन यांच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट 19 मार्च 2026 ला रिलीज झाला आहे. आता हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ला तगडी टक्कर देताना दिसत आहे. 'धुरंधर २' चित्रपट 'पुष्पा २'ला मागे टाकण्यासाठी काही पावले दूर आहे. 'धुरंधर २' ने तिसऱ्या मंगळवारी किती कमावले, जाणून घेऊयात.

'धुरंधर: द रिव्हेंज' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 20

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाने २० व्या दिवशी म्हणजे तिसऱ्या मंगळवारी १३,५५४ शोजमधून १०.१० कोटी रुपयांची एकूण कमाई केली. २० व्या दिवशी 'धुरंधर २' चे भारतातील नेट कलेक्शन १,०३३.३७ कोटी रुपयांवर पोहोचले. दरम्यान, परदेशातील व्यवसायातून मंगळवारी आंतरराष्ट्रीय कमाईच्या एकूण आकड्यात आणखी ४ कोटी रुपयांची भर पडली, ज्यामुळे एकूण आंतरराष्ट्रीय कमाई ४०४ कोटी रुपयांवर पोहोचली. हा आकडा आणि भारतातील १,२३७.२१ कोटी रुपयांची एकूण (Gross) कमाई मिळून 'धुरंधर: द रिव्हेंज' चे जगभरातील एकूण कलेक्शन १,६४१.२१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

'पुष्पा 2' vs 'धुरंधर 2'

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २: द रुल' चित्रपटाने भारतात सर्व भाषांमधून मिळून (अंदाजे) 1234.10 कोटींची नेट कमाई केली. तर जगभरात 1742.10 कोटी कमावले आहेत. दरम्यान, 'धुरंधर २' ने भारतीय बॉक्स ऑफिसवर १,०३३.३७ कोटी आणि जगभरात १,६४१.२१ कोटी कमावले आहेत. या अर्थी 'पुष्पा २' ला मागे टाकण्यासाठी 'धुरंधर २' ला अजून भारतीय बॉक्स ऑफिसवर ₹२००.७३ कोटी आणि जगभरात ₹१००.८९ कोटी कमवायचे आहेत.

'धुरंधर' चित्रपट

'धुरंधर' चित्रपटालाही प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. 'धुरंधर' 5 डिसेंबर 2025 रिलीज झाला होता. 'धुरंधर' चित्रपट रिलीज झाल्यानंतर अक्षय खन्नाचा सर्वत्र बोलबाला पाहायला मिळाला. यात रणवीर सिंगसोबत सारा अर्जुन, सारा अर्जुन, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना हे कलाकार झळकले.'धुरंधर 2' चित्रपटाची कथा भारताचा गुप्तहेर असलेल्या आणि पूर्वी 'जसकीरत सिंह रंगी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हमझा अली माझारीच्या प्रवासाची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : खांद्यावर स्टार, अंगावर खाकी; डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी तरुणी बनली थेट PSI

Maharashtra News Live Update: विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT