Dharmendra-Hema Malini Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dharmendra-Hema Malini: 'ड्रीम गर्ल'शी लग्न करण्यासाठी धर्म-नाव बदलले, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची हटके लव्हस्टोरी

Dharmendra-Hema Malini Lovestory: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लव्हस्टोरी कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाही. या दोघांनी आपल्या प्रेमासाठी धर्म आणि नावदेखील बदलले होते.

Siddhi Hande

धर्मेंद्र हे बॉलिवूडमधील खूप लोकप्रिय अभिनेते होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहेत. ते चित्रपटांसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असायचे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लव्हस्टोरीही कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नव्हती.

धर्मेंद्र-हेमा मालिनीची पहिली भेट (Dharmendra Hema Malini Lovestory)

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लव्हस्टोरी खूप हटके होती.धर्मेंद्र यांनी ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यासाठी सर्वकाही केले. त्यांची पहिली भेट 'तुम हसीन मै जवान' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

लग्न झालेल्या धर्मेंद्र यांच्यासोबत राहायला तयार होती हेमा मालिनी

चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची जवळीक वाढली आणि त्यांच्यात प्रेम जुळले. धर्मेंद्र यांचे आधीच प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न झाले होते. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांचे लग्न झाले हे माहित होते. त्यांना मुलेदेखील आहेत, हेदेखील माहित होतं. तरीही हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्यासोबत राहण्यास तयार होत्या.

ड्रीम गर्लशी लग्न करण्यासाठी धर्म बदलला (Dharmendra Real Life Story)

धर्मेंद्र यांना हेमा मालिनी यांच्यासोबत राहायचे होते परंतु त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोटदेखील द्याचा नव्हता. परंतु ते हिंदू विवाह अधिनियमानुसार दुसऱ्यांदा लग्न करु शकत नव्हते. यावेळी त्यांनी आपला धर्म बदलण्याचा निर्णय घेतला. २१ ऑगस्ट १९७९ रोजी त्यांनी मुस्लिम धर्म स्विकारला. यासाठी धर्मेंद्र यांनी आपले नाव बदलून दिलावर खान ठेवले होते तर हेमा मालिनीने आपले नाव आयश बी ठेवले होते.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनीचे लग्न

मुस्लिम धर्म स्विकारल्यानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी निकाह केला. त्यांच्या या निकाहबद्दल कोणालाच माहित नव्हतं. परंतु जेव्हा ही माहिती समोर आली तेव्हा खूप धक्का बसला होता. यामुळे अनेक वाददेखील झाले परंतु त्यांनी आपल्या नात्यावर याचा कोणताही परिणाम होऊ दिला नाही.

निकाह झाल्यानंतर काही महिन्यांनी १ मे १९८० रोजी हिंदू धर्मानुसार लग्न केले. हेमा मालिनी यांना धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्यामुळे काहीही अडचण नव्हती. हेमा मालिनी आजदेखील धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबापासून लांब राहतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Public Holiday : पुढच्या गुरूवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी, शाळा-सरकारी कार्यालये राहणार बंद

Maharashtra Live News Update: अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे मृत्यू झालेल्या गरोदर मातेला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन

Prajakta Mali : 'रानबाजार'नंतर आणखी एक जबरदस्त वेब सीरिज घेऊन येतेय प्राजक्ता माळी, 'त्या' फोटोनं वाढली चाहत्यांची उत्सुकता

Ambernath Politics: मोठी बातमी! अंबरनाथमध्ये राजकीय भूकंप, काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

Akshaya Deodhar Mangalsutra Designs: पाठक बाईंच्या मंगळसूत्राची महिलांना क्रेझ, हे आहेत लेटेस्ट ट्रेडिंग पॅटर्न

SCROLL FOR NEXT