Devmanus Marathi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Devmanus: ‘देवमाणूस’ च्या निमित्ताने 'या' अभिनेत्रीचं लेखन क्षेत्रात पदार्पण; सुपरहिट साऊथ सिनेमासाठी केलं होतं काम

Devmanus Marathi Movie : मराठी चित्रपटसृष्टीतील मालिका, चित्रपट आणि वेब सिरीज अशा माध्यमात काम करणारी अभिनेत्री लवकरच ‘देवमाणूस’ या चित्रपटाच्या निमित्ताने लेखन क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

Shruti Vilas Kadam

Devmanus: लोकप्रिय मराठी मालिका, चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा शितोळे आता एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. नेहा लेखिका बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी ‘सीतारामन’ या दक्षिण भारतीय चित्रपटासाठी हिंदी संवाद लेखन केलेल्या नेहाने आता देवमाणूस या सिनेमाच्या पटकथा आणि संवाद लेखनाची जबाबदारी उचलली आहे.

लेखकाच्या भूमिकेत पदार्पण करताना नेहा सांगते, “लेखनाची आवड मला नेहमीच होती आणि ‘देवमाणूस’साठी पटकथा आणि संवाद लेखन करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे. हा चित्रपट एक थरारक कथा मांडतो आणि त्याला एक भावनिक बाजूसुद्धा आहे. अभिनेत्री ह्या नात्याने आत्ता पर्यंत भावना व्यक्त केल्या होत्या, त्यामुळेच ते सर्व लिखाणात उतरवताना आधीच्या अनुभवाची मदत झाली”

ती पुढे म्हणते, ”‘लव फिल्म्स’ने माझ्यावर विश्वास ठेवला, याबद्दल मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे. तसेच दिग्दर्शक तेजस देऊसकर यांनी मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचीही ऋणी आहे. ‘देवमाणूस’साठी लेखन करणे ही माझ्यासाठी आयुष्याला कलाटणी देणारी संधी होती. हा प्रवास खूप आव्हानात्मक आणि त्याचबरोबर खूप समृद्ध करणारा ठरला. विशेषतः अशा प्रतिभावान टीमसोबत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता.”

लव फिल्म्स प्रस्तुत, "देवमाणूस" या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर याने केले आहे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका असून हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारने पुन्हा घेतला मोठा निर्णय

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

SCROLL FOR NEXT