Devara OTT Deal canva
मनोरंजन बातम्या

Devra Movie: 'देवरा' चित्रपटाने प्रभासच्या 'कल्की 2898AD' चा रेकॉर्ड मोडणार; पहिल्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

Devra Movie Box Office Collection : साउथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचा 'देवरा' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटानं पहिल्याचं दिवशी प्रभासच्या 'कल्की 2898AD' चा रेकॉर्ड मोडणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय.

Saam Tv

साउथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि जान्हवी कपूर यांचा बहुप्रतिक्षित 'देवरा: पार्ट १' चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतोय. अभिनेत्री जान्हवी कपूरचा हा पहिला तेलुगू चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये सैफ आली खान याने खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये ज्युनिअर एनटीआरच्या जबरदस्त अभिनयामुळे चाहत्यांनी त्याचं भरभरून कौतुक केलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.

प्रेक्षकांना हा चित्रपट भरपूर आवडला आहे. तर काही प्रेक्षकांना चित्रपट काही खास वाटला नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री जान्हवी कपूर आणि सैफ आली खान पहिल्यांदाच दक्षिणात्य चित्रपटामध्ये झळकली आहे. या चित्रपटामध्ये मराठमोळी अभिनेत्री श्रुत्री मराठे देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली आहे.

देवरा या चित्रपटाचे दिग्दर्शन कोराताला शिवा यानी केले आहे. या चित्रपटामध्ये ज्युनिअर एनटीआरची दुहेरी भूमिका पाहायला मिळतेय. अनेक चाहत्यांना हा चित्रपट पैसा वसूल वाटत आहे. या चित्रपटामधील अॅक्शन सीन्स प्रेक्षकांना खुप आवडत आहे. या चित्रपटाने जगभरात १४० कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट कन्नड, तमिळ, मल्यालम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने देशांतर्गत ७७ कोटींचा गल्ला गाठला आहे.

या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पहिल्या युजर्सने प्रतिक्रिया दिली की, " देवरा चित्रपटामधील सैफचा अभिनय खुप भारी आहे." तर दुसऱ्या युजर्सने लिहिले की, "चित्रपटामधील सैफचा अभिनय अंडररेटेड आहे." चित्रपटामधील अॅक्शन सिन्स अतिशय दमदार आहे. त्यासोबतच चित्रपटाती सिनेमेटोग्राफी देखील खुप छान आहे. चित्रपटाबद्दल प्रेक्षकांकडून चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया आला आहेत. अनेक चेहत्यांनी हा चित्रपट एकदा तरी पाहावा असं देखील सांगितले आहे. अनेक चाहत्यांना चित्रपटामधील ज्युनिअर एनटीआर आणि जान्हवी कपूर जोडी आवडत्ये.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : 'बिग बॉस' फेम अभिनेता विकतोय LPG सिलिंडर? किंमत वाचून येईल चक्कर

Maharashtra Live News Update : अमरावती ठरले देशातील सर्वाधिक उष्ण शहर; 41.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद

Gas Cylinder Clash : गॅस सिलेंडरवरुन हाणामारी आणि राडा, एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत गेला वाद

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या निधीत कपात; ९५०० कोटी कापले; नेत्यानं थेट आकडेवारीच दिली

घरगुती गॅसचा साठा, व्यावसायिकांवर छापा; सामच्या ऑपरेशन सिलेंडरनंतर प्रशासनाला जाग

SCROLL FOR NEXT