Sky Force Vs Deva Box Office: बॉलिवूड स्टार शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटाची खूप चर्चा होती. आठवड्याच्या शेवटी त्याने चांगला व्यवसाय केला पण आता हा चिज्ञपट बॉक्स ऑफिसवर संध गतीने सुरु असल्याचे दिसत आहे. तुलनेत अक्षय कुमारचा स्काय फोर्स अजूनही चांगली कमाई करत आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटात मोठी स्पर्धा पहायला मिळत आहे.
शाहिद कपूरचा 'देवा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपले स्थान टिकवू शकला नाही. या चित्रपटात शाहिद एका पोलिसाची भूमिका साकारत आहे. पण लोकांना त्याचा हा लूक बहुदा आवडत नसल्याचा पाचव्या दिवसाची कमाई पाहून अंदाज लावला जात आहे.
पाचव्या दिवशी त्याने २.३५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. देवा चित्रपटाने आतापर्यंत एकूण कलेक्शन २४.२५ कोटी रुपयांचा गल्ला केला आहे. तसेच आता बॉक्स ऑफिसवर त्याची गती मंदावली आहे. देवा हा चित्रपट लोकांची मने जिंकू शकला नसल्याने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेइतका कलेक्शन करू शकला नाही.
देवाचा एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन
'देवा'ने भारतात, पहिल्या दिवशी ५ कोटी रुपये कमावले. 'देवा'ने दुसऱ्या दिवशी ६.२५ कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी कलेक्शन ७.१५ कोटी रुपये होते. चौथ्या दिवशी त्याने ३.३९ कोटी कमावले. तर, पाचव्या दिवशी त्याने २.३५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. तसेच, जगभरात चित्रपटाचा एकूण कलेक्शन ४०.६५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
'देवा'चे बजेट ८० कोटी रुपये आहे. त्याच्या कमाईच्या गतीकडे पाहता, असे दिसते की चित्रपट त्याचे बजेटही वसूल करू शकणार नाही. या चित्रपटाची अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' चित्रपटाशी जोरदार स्पर्धा सुरु आहे. 'स्काय फोर्स' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला १२ दिवस झाले आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने सुमारे १०३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर, १२ व्या दिवशी या चित्रपटाने १.३५ कोटी रुपयांची कमाई केली.
अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' हा चित्रपट 'देवा'च्या आधी प्रदर्शित झाला होता. पण तरीही लोक 'स्काय फोर्स' पाहण्यासाठी थिएटरमध्ये जात आहेत. 'स्काय फोर्स' आधीच १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. आता हे पाहणे बाकी आहे की 'स्काय फोर्स' या आठवड्यात देवापेक्षा किती जास्त पैसे कमवतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.