
Celebrity Masterchef: 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये जज शेफने 'पवित्र रिश्ता' फेम मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचे जेवण चाखण्यास नकार दिला आहे. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना उषा नाडकर्णी यांच्या अधिक राग येत आहे.
उषा नाडकर्णी यांनी बनवलेले जेवण चाखण्यास दिला नकार
शोच्या निर्मात्यांनी अलीकडेच 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' चा एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये परीक्षकांनी उषा नाडकर्णी यांनी बनवलेले जेवण चाखण्यास नकार दिला आहे. या व्हिडीओमध्ये, फराह खान उषा नाडकर्णी यांना विचारते की त्यांनी काय बनवले आहे? तर त्या उत्तर देत म्हणल्या, चिकन सुका.
तुम्ही कधीकधी ऐकत नाही
यानंतर जेव्हा जज त्यांची डीश खातात तेव्हा उषा विचारतात, काय झाले? फराह म्हणाली, हे चिकन पूर्णपणे कच्चे आहे. यावर रणवीर ब्रार म्हणतो जर कोणीही हे खाल्ले तर आपण आजारी पडू. यावर उषा म्हणतात, मी चाकू घालून चेक केला आहे. यावर फराह म्हणते, जेव्हा शेफ तुम्हाला सांगेल तेव्हाच तुम्ही ऐकावे. यावर उषाताई उत्तर देतात मग मी तुला सांगायला हवे. मग फराह म्हणते, तुम्ही कधीकधी ऐकत नाही.
लोक म्हणाले, उषा ताई खरोखरच खूप उद्धट आहेत
आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांचा उषाचा राग येत आहे. एका वापरकर्त्याने लिहिले उषा ताई खरोखरच खूप चिडखोर आणि स्पष्टवक्त्या आहेत. आपण त्यांच्या वयाचा आदर करतो, पण त्यांनीही सर्वांचा आदरही केला पाहिजे. आणखी एकाने लिहीले, त्या नेहमीच वयस्कर असल्याचे कार्ड खेळण्याचा प्रयत्न करतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.