Sameer Wankhede vs Aryan Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sameer Wankhede VS Aryan Khan: समीर वानखेडेंना दिल्ली हाय कोर्टचा दणका, शाहरुखचा मुलगा आर्यनला दिलासा, काय घडलं?

Sameer Wankhede VS Aryan Khan: माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेब सिरीजविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. पण, या प्रकरणात त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे, तर शाहरुख खानच्या मुलाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Shruti Vilas Kadam

Sameer Wankhede VS Aryan Khan: आयआरएस अधिकारी आणि माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शित 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' या वेब सिरीजवर त्यांची प्रतिमा खराब करण्याचा आणि त्यांची थट्टा करण्याचा आरोप केला होता. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत शाहरुख खान, गौरी खान, नेटफ्लिक्स इंडिया आणि रेड चिलीज यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला. पण, या प्रकरणात समीर वानखेडे यांना मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी न्यायालयाने मानहानीचा खटला फेटाळून लावला.

समीर वानखेडे यांनी मालिकेतील एका दृश्यावर आक्षेप घेतला यामध्ये एक नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा अधिकारी ड्रग्जच्या व्यसनी डीजेशी संपर्क साधतो. त्यानंतर तो दुसऱ्या मुलाकडे बोट दाखवतो आणि बोलतो मी नाही तो स्टार किड आहे त्याला पकडू शकतो. त्यानंतर अधिकारी त्या स्टार किडला सोबत घेऊन जातो. समीरने दावा केला की आर्यन खानने या सीनद्वारे त्यांचा अपमान केला होता. कारण समीर वानखेडे यांनी यापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्ये क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यनला अटक केली होती. पण, नंतर त्याला ड्रग्जच्या आरोपातून मुक्त करण्यात आले.

आता, न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार यांच्या एकल खंडपीठाने निकाल देताना असा निर्णय दिला की, हा खटला फक्त मुंबई न्यायालयांमध्येच चालवता येईल, कारण त्यांच्याकडे अधिकार क्षेत्र नाही. दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय समीरसाठी धक्कादायक असला तरी, तो आर्यन खानसाठी दिलासा ठरला.

२ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली

समीर वानखेडे यांनी मानहानीचा दावा दाखल करण्यासोबतच २ कोटी रुपयांची नुकसानभरपाईही मागितली. त्यांनी ही रक्कम टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला देणगी देण्याचा दावा केला. त्यांनी सिरीजमधून ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित मजकूर त्वरित काढून टाकण्याची मागणीही केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT