Deepika Padukone SAAM TV
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone : दीपिका पादुकोणचं देओल कुटुंबाशी नातं जुळणार, बहीण अनिशा लवकरच लग्नबंधनात अडकणार, सोशल मीडियावर चर्चा

Deepika Padukone- Sunny Deol Connection : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणची बहीण लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. दीपिका पादुकोणचं देओल कुटुंबशी नवीन नातं जुळणार आहे. सविस्तर वाचा.

Shreya Maskar

दीपिका पादुकोणचे देओल कुटुंबाशी नवीन नातं जुळणार आहे.

दीपिका पादुकोणची बहीण लवकरच लग्न करणार आहे.

अनिशा पादुकोणच्या होणाऱ्या नवऱ्याचे देओल कुटुंबाशी खास कनेक्शन आहे.

सध्या मनोरंजन सृष्टीत लगीन घाई पाहायला मिळत आहे. अशात आता बॉलिवूडमधून आनंदाची बातमी समोर आली आहे. बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणची धाकटी बहीण अनिशा पदुकोण लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. अनिशा पदुकोण खूप वेळापासून रोहन आचार्यला डेट करत आहे त्यामुळे आता ही जोडी लवकर विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगली रंगली आहे.

रोहन आचार्यचे देओल कुटुंबाशी खास नाते आहे. त्यामुळे दीपिका पादुकोण-रणवीर सिंग हे लवकरच सनी देओलचे नातेवाईक होणार आहेत. रोहन आचार्य हा प्रसिद्ध चित्रपट निर्माते बिमल रॉय यांचा पणतू आहे. तसेच तो सनी देओलच्या सुनेचा भाऊ आहे. रोहनची आई चिमू आचार्य या बिमल रॉय यांची मुलगी रिंकी रॉय भट्टाचार्य यांची मुलगी आहे. तसेच सनी देओलचा लेक करण देओलची बायको दृशा आचार्य ही रोहन आचार्यची बहीण आहे. म्हणजेच रोहन हा सनी देओलच्या सुनेचा भाऊ आहे.

रोहन आचार्य आणि अनिशा पादुकोण यांचे लग्न झाल्यावर पादुकोण आणि देओल कुटुंब नातेवाईक बनतील. अनिशा पादुकोण लाइमलाइटपासून दूर आहे. ती एक व्यावसायिक गोल्फर आहे. अनिशा आई-वडीलांसोबत बंगळूरुमध्ये राहते. मात्र अद्याप रोहन आचार्य आणि अनिशा पदुकोण यांच्या लग्नाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

रोहन आचार्यला दीपिका आणि रणवीर दोघेही इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंहचे आई-वडील आणि रोहनचे वडील सुमित आचार्य हे चांगले मित्र आहेत. एका कौटुंबिक समारंभात अनिशा आणि रोहन यांची भेट झाली. त्यानंतर दोघे बोलू लागले. त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. अनिशा पादुकोण ही 34 वर्षांची आहे. अनिशा पादुकोण 'लाइव्ह लव्ह लाफ फाउंडेशन'ची ती प्रमुख आहे. रोहन आचार्य देखील उद्योजक आहे. तो दुबईमध्ये आहे. तो कौटुंबिक ट्रॅव्हल व्यवसायात काम करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: लहानपणी होते तसे दाट, लांबसडक आणि चमकदार केस हवेत? मग घरीच करा 'हा' सोपा उपाय

Maharashtra News Live Update: मेळघाटात धक्कादायक प्रकार; दफन केल्यानंतर 23 दिवसांनी मृतदेह काढला बाहेर

मुगाची डाळ टाकून टाकळ्याची भाजी कशी बनवायची? सोपी रेसिपी

Amravati Crime : दफन केलेला तरुणाचा मृतदेह २३ दिवसांनी पुन्हा थडग्याबाहेर काढला; धक्कादायक आलं समोर?

Pune News: उद्यानातील झाडांवर फिरवली कुऱ्हाड, पालिकेचा कर्मचारीच निघाला 'पुष्पा'; लाकडं घेऊन जातानाचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT