Deepika Padukone saam tv
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone : चाहत्याच्या आईने पुरणपोळी आणली अन् दीपिकाने थेट...; VIDEO मधील साधेपणा पाहून नेटकरी भारावले

Deepika Padukone Viral Video : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने आपल्या कृतीने लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तिने चाहत्याच्या आईने बनवलेली पुरणपोळी स्वीकारली. याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

5 जानेवारीला दीपिका पादुकोणचा वाढदिवस झाला.

दीपिका पादुकोण 'मीट अँड ग्रीट' कार्यक्रमात आली होती.

दीपिकाने चाहत्याच्या आईने बनवलेली पुरणपोळी प्रेमाने स्वीकारली.

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणचा नुकताच (5 जानेवारी 2026) वाढदिवस झाला. दीपिकाने आजवरच्या करिअरमध्ये खूप लोकप्रियता मिळवली आहे. तिच्या अभिनयाचे, सौंदर्याचे तसेच साधेपणाचे चाहते दिवाने आहेत. ती कायम आपल्या फॅन्सना चांगली वागणूक देताना दिसते. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नुकताच दीपिका पादुकोण एका 'मीट अँड ग्रीट' कार्यक्रमात आली होती. येथे अनेक भेटवस्तू मिळाल्या. तिने त्या आनंदाने स्वीकारल्या. या कार्यक्रमाला दीपिकाच्या चाहत्यांनी हजेरी लावली. तेव्हा एक चाहता आपल्या आईसोबत तिथे आला होता. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्या चाहत्याची आई नम्रपणे दीपिकाला भेटते. तिने दीपिकासाठी खास स्वतःच्या हाताने बनवलेली पुरणपोळी आणली.

दीपिका पादुकोणने चाहत्याच्या आईने दिलेली पुरणपोळी खूप प्रेमाने स्वीकारली. त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला. त्यांचा हात हातात घेतला आणि फोटो देखील काढला. दीपिका पादुकोणने पुरणपोळीसाठी आईचे आभार देखील मानले. या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. दीपिका पादुकोणला पाहून चाहत्याची आई चांगलीच भारावून गेली.

काही काळापासून दीपिका पादुकोण तिच्या 8 तासांच्या शिफ्टच्या निर्णयावरून चांगलीच चर्चेत आहे. तिने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. 2007 साली रिलीज झालेल्या 'ओम शांती ओम' मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. दीपिका पादुकोणने बॉलिवूडसोबत साऊथ आणि हॉलिवूडमध्येही काम केले आहे. दीपिका पादुकोण आता लवकरच शाहरुख खानच्या आगामी 'किंग' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंचे आदेश, मनसे कार्यकर्त्यांनी थेट बॉम्बे धाब्याचा फलक फाडला; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: राज्यातील सर्वाधिक थंडी पूर्ण शहरात, पारा ९.५ अंशावर

Winter Alert : महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी! परभणीत तापमान ६ अंशावर; इतर जिल्ह्यात हवामान कसं?

DA Hike: ३% की ५%, सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार ? वाचा सविस्तर

Til Barfi Recipe : मकर संक्रांतील पाहुण्यांसाठी खास बनवा तिळाची मऊसूत बर्फी, वाचा सिंपल रेसिपी

SCROLL FOR NEXT