Alia Bhatt Comment On Deepika Padukone Post Instagram Alia Bhatt
मनोरंजन बातम्या

Deepika - Alia Bhatt On Instagram : अरे ही तर पप्पी, दीपिकाच्या योगा पोझ वर आलीयाची भन्नाट कमेंट व्हायरल

Alia Bhatt Comment Goes Viral : दीपिका पदुकोणने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर योगा करतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे.

Pooja Dange

Alia Bhatt Comment On Deepika Padukone Post : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या दमदार अभिनयासोबतच तिच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. योग दिनानिमित्त अनेक स्टार्सनी योग करतानाचे फोटो शेअर केले आहेत. दरम्यान दीपिका पदुकोणने देखील तिच्या चाहत्यांना फिट राहण्यासाठी प्रेरित करताना दिसली.

दीपिका पदुकोणने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर योगा करतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये दीपिकाचा चेहरा दिसत नाहीये. (Latest Entertainment Post)

अभिनेत्री आपले दोन्ही हात पुढे करून जमिनीवर ठेवले आहेत. तर दोन्ही गुडघे जमिनीवर असून कंबर वर केली आहे. हा फोटो पाहिल्यानंतर दीपिका इतकी फिट का आहे, याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो.

या फोटोसोबत दीपिका पदुकोणने तिच्या चाहत्यांना एक प्रश्नही विचारला आहे. अभिनेत्रीने कॅप्शनद्वारे सर्वांना या आसनाचे नाव विचारले. तर दीपिकाच्या या पोस्टवर अनेक स्टार्स आणि चाहते या आसनाचे नाव सांगताना दिसत आहेत.

मात्र आलिया भटच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आलियाने गंमतीने या आसनाचे नाव पप्पी पोज असे ठेवले आहे. आलियाची ही कमेंट तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.

त्याचबरोबर दीपिकाच्या फिटनेसचे चाहतेही वेडे झाले आहेत. अलीकडेच करण देओलच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये दीपिका दिसली होती.

जिथे ती पती रणवीर सिंहसह गेली होती. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा डान्स करतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. दीपिका क्वचितच डान्स करताना दिसते. त्यामुळे चाहत्यांनी तिच्या या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव केला होता.

दीपिका पदुकोण फायटर या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामधून दीपिका पहिल्यांदा हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT