Pooja Bhatt BB OTT2 Update: अभिनेत्री आणि निर्माती पूजा भट सध्या चर्चेत आहे. पूजा भट बिग बॉस ओटीटी सीजन २ मध्ये सहभागी झाली आहे. शोमध्ये तिने तिच्या भूतकाळाविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
अभिनेता रणवीर शौर्यसोबतच्या अफेअरमुळे पूजा भट अनेकदा चर्चेत आली होती. मात्र, ती सुपरस्टार सलमान खानचा भाऊ सोहेल खानसोबत सिरीयस रिलेशनशिप असल्याचे अनेकांना माहित होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते आणि त्यांनी लग्नाचीही प्लॅन केला होता.
1995 मध्ये एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत पूजाने सोहेल खानसोबतच्या तिच्या लग्नाच्या प्लॅन्सविषयी सांगितले होते. तिने सांगितले होते की, "मला लग्न करायचे आहे, परंतु सोहेल दिग्दर्शक म्हणून एका रोमांचक, नवीन करिअरच्या उंबरठ्यावर आहे.
मला कुठल्याही निर्णयापर्यंत पोचण्याआधी भरपूर काम करायचे आहे आणि त्यासाठी कमीत कमी दोन वर्ष हवी आहेत. आम्हाला नक्कीच भविष्यात एकत्र यायचा आहे. कोणत्याही नात्याच्या सामान्य गरजेप्रमाणेच एकत्र राहण्याची इच्छा आहे. मला ते हवे आहे आणि त्यालाही तेच हवे आहे." (Latest Entertainment News)
ती पुढे म्हणाली, "आमचे नाते विश्वास, आदर, समजूतदारपणा यावर आधारित आहे. शेवटी, आम्हाला आमच्या नात्याची किंमत माहित आहे. पण वाईट विचार करणारे वाईटच विचार करणार. नकारात्मक नेहमीच असते.
काही वकील जे नेहमी प्रार्थना करतात की लोकांनी बेकायदेशीर गोष्टी कराव्यात किंवा घटस्फोट व्हावेत, जेणेकरून ते त्यातून उपजीविका करू शकतील. मग ते व्यावसायिक असो किंवा वैयक्तिक. मी फक्त स्वतःचं ऐकतेआणि मी फक्त माझ्याशी तडजोड करते. उर्वरित जगाचे मला काहीही देणं-घेणं नाही."
पूजा आणि सोहेलचे लग्न झाले नाही. अभिनेता-दिग्दर्शकाने 1998 मध्ये सीमा खानशी लग्न केले, तर पूजा भटने 2004 मध्ये मनीष माखिजाशी लग्न केले. तर सोहेल आणि सीमा यांचा 2022 मध्ये घटस्फोट झाला आणि ते वेगळे झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.