Dhurandhar 2  saam tv
मनोरंजन बातम्या

Dhurandhar 2 : बडे साहेबांना पाहून बसेल 440 होल्टचा धक्का, चाहते म्हणाले- हे तर मरे साहब| VIDEO

Who Is Bade Sahab In Dhurandhar 2 : 'धुरंधर २' चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटातील बडे साहेब नेमकं कोण, हे पाहिल्यावर तुम्हाला मोठा धक्का बसणार आहे.

Shreya Maskar

'धुरंधर 2' चित्रपट रिलीज झाला आहे.

चित्रपटात बडे साहेबची भूमिका चांगलीच चर्चेत आहे.

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर 2' ला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

बहुप्रतीक्षित चित्रपट 'धुरंधर 2' रिलीज झाला आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते. अखेर आज (19 मार्च) ला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'धुरंधर 2'चा ट्रेलर पाहून प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक असल्याचे दिसत आहे. ट्रेलरमधील रणवीर सिंगचा धमाकेदार ॲक्शन अवताराने सर्वांचे लक्ष वेधन घेतले आहे. 'धुरंधर 2' चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. अशात आता चित्रपटाच्या रिलीजनंतर 'धुरंधर 2' मधील बडे साहेबचा चेहरा समोर आला आहे.

कोण आहे बडे साहेब?

रणवीर सिंहच्या चाहत्यांनी 18 मार्च रोजी 'धुरंधर २' चा 'फर्स्ट-डे-फर्स्ट-शो' प्री-रिलीज शो आधीच पाहिला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर सिनेमाचे प्रचंड रिव्ह्यू येत आहेत. 'धुरंधर २' चित्रपटाबाबत पहिल्यापासून एकच चर्चा पाहायला मिळाली की, बडे साब? मात्र आता बडे साबच्या चेहऱ्यावरील पडदा उठला आहे. ज्यामुळे प्रेक्षक खूपच थक्क झाले आहेत. 'धुरंधर २'च्या प्री-रिलीज शोमधून 'बडे साब'ची खरी ओळख समोर आली आहे. 'धुरंधर द रिव्हेंज'मध्ये बडे साहेब म्हणजे दाऊद इब्राहिम आहे. जो खूप वृद्ध दिसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही भूमिका दानिश इकबालने साकारली आहे.

'धुरंधर द रिव्हेंज'चा पहिला भाग 'धुरंधर' 5 डिसेंबर 2025 रिलीज झाला होता. रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या या स्पाय-थ्रिलरला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. 'धुरंधर' चित्रपटात रणवीर सिंगसोबत सारा अर्जुन, सारा अर्जुन, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना हे कलाकार झळकले. या चित्रपटात अक्षय खन्नाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. तसेच त्याचे FA9LA गाणे प्रचंड गाजले.

'धुरंधर 2'मध्ये बडे साबला पाहून प्रेक्षक कमेंटचा वर्षाव करत आहे. त्यांना मोठा धक्का बसला आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. 'धुरंधर 2'ने रिलीज आधीच ॲडव्हान्स बुकिंगमध्ये बक्कळ कमाई केली आहे. हा चित्रपट 500 कोटींपेक्षा अधिक कमाई करेल असे बोले जात आहे. चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये तुफान गर्दी करताना दिसत आहे. हा 'धुरंधर 2' ॲक्शनचा धमाका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई- आयकर विभागाच्या कार्यालयाला आग

मोठी बातमी! बड्या नेत्याची भाजपने केली तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी, महाराष्ट्रात खळबळ

Famous Actress Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

Nashik Earthquake : नाशिक पुन्हा हादरलं! एकापाठोपाठ ३ तालुक्यांमध्ये दोनदा बसले भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट

मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली अन्...;

SCROLL FOR NEXT