Dashavatar Collection saam tv
मनोरंजन बातम्या

Dashavatar Collection : 99 रुपयांच्या ऑफरची जादू; मंगळवारी 'दशावतार' हाऊसफुल, कमाईचा आकडा किती?

Dashavatar Box Office Collection Day 5 : दिलीप प्रभावळकर यांचा 'दशावतार' चित्रपट पाहण्यासाठी मंगळवारी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली. मंगळवारी चित्रपट फक्त 99 रुपयांत पाहायला मिळाला. चित्रपटाचे एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'दशावतार' चित्रपट मंगळवारी फक्त 99 रुपयांत पाहायला मिळाला.

'दशावतार' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिलीप प्रभावळकर झळकले आहे.

'दशावतार' 12 सप्टेंबरला रिलीज झाला.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar ) यांच्या 'दशावतार' (Dashavatar) चित्रपट 12 सप्टेंबरला रिलीज झाला. सध्या तो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. 'दशावतार' चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर आहेत. 'दशावतार' चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्यासोबत महेश मांजरेकर, भरत जाधव, प्रियदर्शनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, आरती वडगबाळकर, रवी काळे, सुनील तावडे आणि विजय केंकरे हे कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

'दशावतार' स्पेशल ऑफर

'दशावतार' चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांसाठी एक खास ऑफर ठेवली होती. ज्याचा फायदा सिनेमाला खूप झाला आहे. चित्रपटाने पाच दिवसांत बक्कळ कमाई केली. 'दशावतार' चित्रपट (16 सप्टेंबर) मंगळवारी फक्त 99 रुपयांत प्रेक्षकांना पाहायला मिळाला. ज्यामुळे मंगळवारी देखील शो हाउसफुल राहीला. चित्रपटाने मंगळवारी किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात.

'दशावतार' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 5

  • दिवस पहिला - 58 लाख रुपये

  • दिवस दुसरा - 1.39 कोटी रुपये

  • दिवस तिसरा - 2.4 कोटी रुपये

  • दिवस चौथा - 1.01 कोटी रुपये

  • दिवस पाचवा - 1.3 कोटी रुपये

  • एकूण - 6.8 कोटी रुपये

'दशावतार' चित्रपट लवकरच 10 कोटींचा व्यवसाय करणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची कथा आणि दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. प्रेक्षक चित्रपट पुन्हा पुन्हा पाहायला थिएटरमध्ये जाताना दिसत आहे. भविष्यात देखील 'दशावतार' ने अशीच यशस्वी घोडदौड ठेवल्यास चित्रपट नक्कीच बंपर कमाई करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stray Dogs: आता कुत्र्यालाही जन्मठेपेची शिक्षा होणार, या राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Narendra Modi: सामान्य चहावाला ते देशाचे पंतप्रधान, नरेंद्र मोदींचे हे फोटो पाहिलेच नसतील

Pratapgad Fort History: शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आणि ऐतिहासिक महत्त्व, प्रतापगड किल्ल्याचा इतिहास

Crime News : प्रसिद्ध मॉलमध्ये सुरक्षा रक्षक महिलेवर बळजबरी; IT कर्मचाऱ्याला बेड्या, काय आहे संपूर्ण प्रकार?

Beed News: बीडकरांचे स्वप्न साकार : बीड-अहिल्यानगर रेल्वेचा पहिला टप्पा सुरू|VIDEO

SCROLL FOR NEXT