Shitti Vajali Re SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shitti Vajali Re : पाहुणं, जेवला काय? गौतमी पाटील छोट्या पडद्यावर येतेय, चवदार जेवण तयार करणार का?

Gautami Patil : नृत्यांगना गौतमी पाटील आता लवकरच छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तिची 'शिट्टी वाजली रे' या कुकिंग शोमध्ये धमाकेदार एन्ट्री झाली आहे.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र मराठी कुकिंग शो 'शिट्टी वाजली रे' ची (Shitti Vajali Re) चर्चा पाहायला मिळत आहे. या शो मध्ये कलाकार मंडळी आपली पाककला दाखवणार आहेत. या कार्यक्रमाच्या घोषणे पासूनच चाहते शोसाठी खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. शो मध्ये कोणते कलाकार सहभागी होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. अशात आता आपल्या नृत्याने जगाला वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलची (Gautami Patil) 'शिट्टी वाजली रे' कार्यक्रमात एन्ट्री झाली आहे.

गौतमी पाटीलने आपल्या ठसकेबाज लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. आता ती छोटा पडदा गाजवायला येत आहे. 'शिट्टी वाजली रे' या कार्यक्रमात गौतमी पाटील देखील सहभागी होणार आहे. गौतमीचं नृत्य कौशल्य संपूर्ण महाराष्ट्र अनुभवतच आहे. शिट्टी वाजली रे कार्यक्रमातून गौतमीचं पाक कौशल्य पाहायला मिळणार आहे. गौतमी किचनमध्ये काय धुमाकूळ घालणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

'शिट्टी वाजली रे' या कार्यक्रमातून गौतमी पाटीलचे टीव्ही विश्वात पदार्पण होते आहे. गौतमीने सांगितल्यानुसार, "तिला जेवण बनवता येत नाही. त्यामुळे हा कार्यक्रम तिच्यासाठी नवा प्रयोग असणार आहे." पदार्थ बनवताना कलाकारांची कशी तारांबळ उडते हे पाहणे मजेशीर ठरणार आहे. 'शिट्टी वाजली रे' हा शो 26 एप्रिलपासून रात्री 9 वाजता स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे.

'शिट्टी वाजली रे' या धमाकेदार शोचे होस्टिंग अमेय वाघ करणार आहे. 'स्टार प्रवाह' ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कलाकरांची एक झलक पाहायला मिळत आहे. 'शिट्टी वाजली रे' कार्यक्रमात निक्की तांबोळी, विजय पाटकर, आशिष पाटील, प्रियदर्शन जाधव, माधुरी पवार, संकेत पाठक, पुष्कर श्रोत्री, रूपाली भोसले, छोटा पुढारी असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT