Manasvi Choudhary
चंद्रकोर पैठणी साडी ही तिच्या नाजूक नक्षीकाम आणि राजेशाही लूकसाठी ओळखली जाते. अशा साडीवर ब्लाऊज शिवताना जर तो आधुनिक आणि पारंपारिक डिझाईनचा असावा.
चंद्रकोर पैठणीसाठी सध्या ट्रेंडमध्ये असलेले ५ ब्लाऊज पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करू शकता.
अनेकांना ब्लाऊजचा मटका गळा पॅटर्न शिवायला आवडतो. हा पॅटर्न सिंपल पण स्टायलिश आहे.
ज्यांना मॉडर्न आणि बोल्ड लूक हवा आहे, त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. समोरून खोल 'V' आकार आणि त्यावर डायमंड वर्क केलेले डिझाईन असते.
जुन्या काळातील फुग्याच्या बाह्यांची डिझाईन सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. कोपरापर्यंत बाह्या आणि त्यावर साडीचा मोठा काठ हे पैठणी साडीवर अतिशय सुंदर दिसते.
केवळ बाह्यांच्या मध्यभागी वेलीचे किंवा कमळाचे नक्षीकाम सध्याचे मिनिमलिस्टिक ट्रेडिंग डिझाइन आहे.
एल्बो लेंथ' बाह्या विथ मॅगम वर्क हा ब्लाऊज पॅटर्न पैठणी साडीवर शोभून दिसतो. कोपरापर्यंत बाह्या ठेवून त्यावर जरदोजी, मणी किंवा कुंदनचा वापर करून मोराची, कलशाची किंवा फुलांची नक्षी काम करा.