Raid 2 Trailer: "एक तरफ सत्ता, दुसरी तरफ सच..."; राजाजीनंतर अमेय पटनायकच्या रडारवर 'दादाभाई', ७५ वी Raid होणार का यशस्वी ?

Ajay Devgn Raid 2 : अजय देवगणचा 'रेड २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अजय देवगणसोबत चित्रपटात महाराष्ट्राचे लाडके रितेश भाऊ झळकणार आहेत.
Ajay Devgn Raid 2
Raid 2 Trailerinstagram
Published On

बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) कायम आपल्या चित्रपटामुळे चांगलचा चर्चेत असतो. त्याला बॉलिवूडमध्ये ॲक्शन किंग म्हणून ओळखले जाते. लवकरच अजय देवगण 'रेड 2' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच 'रेड 2' (Raid 2 Trailer) चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या घोषणेपासून चाहते सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत रितेश देशमुख पाहायला मिळणार आहे.

'रेड 2'मध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख (Riteish Deshmukh) एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळणार आहे. 'रेड 2'च्या ट्रेलरला हटके कॅप्शन दिले आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "एक तरफ सत्ता, दुसरी तरफ सच - ये RAID अब और बडी हो चुकी है..." या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ट्रेलरमध्ये पाहायला मिळते की, दादाभाईच्या घरी अमेय पटनायक रेड मारायला येतो. आता ही रेड किती यशस्वी होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

'रेड 2' चित्रपटात रितेश देशमुख दादाभाईच्या भूमिकेत आहे. अजय आणि रितेश सोबतच या चित्रपटात वाणी कपूर, सौरभ शुक्ला हे कलाकारही पाहायला मिळणार आहेत. 'रेड 2' 1 मे 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रेड' चित्रपट सुपरहिट ठरला होता. 'रेड 2' हा ॲक्शन चित्रपट आहे.

'रेड' 2018 ला प्रदर्शित झाला होता. आता सात वर्षांनी 'रेड 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रेड 2'मध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. 'रेड 2' चित्रपटाचे दिग्दर्शन राज गुप्ता यांनी केले आहे.

Ajay Devgn Raid 2
Pawan Kalyan : पवन कल्याण यांच्यावर गंभीर आरोप, 30 विद्यार्थ्यांची परीक्षा चुकली, नेमकं घडलं काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com