HBD Nora Fatehi  SAAM TV
मनोरंजन बातम्या

HBD Nora Fatehi : फक्त 5 हजार रुपये घेऊन भारतात आलेली नोरा फतेही आज कोट्यवधींची मालकीण, संपत्तीचा आकडा ऐकून डोळे भिरभिरतील

Nora Fatehi Net Worth : बॉलिवूडची डान्स क्वीन नोरा फतेही हिचा आज वाढदिवस आहे. तिने डान्समुळे आपली खास ओळख बॉलिवूडमध्ये निमार्ण केली आहे. तिची एकूण संपत्ती किती, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूडची स्टार नोरा फतेहीचा (Nora Fatehi) आज (6 फेब्रुवारी ) वाढदिवस आहे. आयटम साँग क्वीन नोरा आज 33 वर्षांची झाली आहे. नोराचे अनेक म्युझिक व्हिडिओ प्रसिद्ध आहेत. आज कोट्यावधींची मालकीण नोरा फतेही भारतात आली तेव्हा तिच्याकडे फक्त 5000 रुपये होते. भारतात पहिल्यांदा आल्यावर नोरा फतेहीने ब्रेड आणि अंड्यांवर दिवस काढले होते. मनोरंजन विश्वात येण्यापूर्वी नोरा फतेही टेलिकॉलर, लॉटरीची तिकिटे विकण्याचे काम देखील केले होते. आपल्या अभिनय आणि डान्सच्या बळावर नोरा फतेहीने इंडस्ट्रीत स्वतःची ओखळ निमार्ण केली आहे.

नेटवर्थ किती ?

मीडिया रिपोर्टनुसार, बॉलिवूडची डान्स क्वीन नोरा फतेही संपत्ती जवळपास 52 कोटी रूपये आहे. अभिनेत्री, नृत्यांगना म्हणून तिची खास ओळख आहे. आजवर तिने दमदार आयटम साँग केले आहेत. नोरा फतेही एका गाण्यासाठी तब्बल 2 कोटी रुपये घेते. नोरा अनेक ब्रँडसोबत कनेक्ट आहे. ती अनेक जाहिरातीतून पैसे कमावते. नोरा फतेहीची 2022 मध्ये केकझोनची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषणा करण्यात आले.

नोरा फतेहीने 'रोर : टायगर ऑफ द सुंदरबन्स' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरची सुरूवात केली. तिचा हा चित्रपट 2014 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. नोरा फतेहीचे मुंबईत वरळी येथे आलिशान घर आहे. तिच्या घराची किंमत कोटींमध्ये आहे. तसेच नोरा आता एअक लग्जरी लाइफ जगत आहे. तिच्याकडे आलिशान कार आहेत. यात लग्जरी ब्रँडच्या गाड्यांचा समावेश आहे. यातल बीएमडब्लू , मर्सिडीज या कारचा समावेश आहे.

नोराचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या डान्सचे, लूकचे फोटो आणि व्हिडीओ ती कायम चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिचे इन्स्टाग्राम 47.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. नोरा फतेही ही एक कॅनेडियन-मोरक्कन अभिनेत्री आहे. नोरा फतेहीने हिंदी, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'बिग बॉस 9'मध्ये नोरा फतेही बिग बॉसमध्ये झळकली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

Anushka Sharma : RCB च्या विजयानंतर अनुष्काची खास पोस्ट; विराटसोबत बेभान होऊन नाचली, मिसेस कोहलींचा आनंद गगनात मावेना | VIDEO

MLC Election : पुण्यात मोठा ट्वीस्ट! भाजप नेत्याला राष्ट्रवादीतून उमेदवारी, ३ तास आधी हातात घड्याळ घेतलं अन्...

SCROLL FOR NEXT