Salman Khan-Abhinav Kashyap SAAM TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan-Abhinav Kashyap : "सलमान खान गुंड, त्याला अभिनयात रस नाही..."; 'दबंग' दिग्दर्शकाचा खळबळजनक आरोप

Abhinav Kashyap Talk On Salman Khan : 'दबंग' चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी सलमान खान आणि त्याच्या कुटुंबावर मोठे आरोप केले आहे. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

अभिनव कश्यप यांनी सलमान खानला गुंड म्हटले आहे.

अभिनव कश्यप यांनी सलमान खानच्या कुटुंबावर देखील आरोप केले आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या 'बिग बॉस 19'चे होस्टिंग करत आहे. तो कायम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला असतो. अशात आता सलमान खान विरोधात दिग्दर्शक अभिनव कश्यपने (Abhinav Kashyap) गंभीर वक्तव्य केले आहे. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊयात.

सलमान खानने अभिनव कश्यप दिग्दर्शित 'दबंग'मध्ये काम केले होते.'दबंग' 2010मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा झळकली. चित्रपटातील गाणी आजही खूप सुपहिट आहेत. नुकत्याच झालेल्या मिडिया मुलाखतीत अभिनव कश्यप म्हणाले की, "सलमान खानला गेल्या 25 वर्षांपासून अभिनय क्षेत्रात रस नाही. तो काम करून फक्त स्वत:वर उपकार करतो. त्याचा सेलिब्रिटी पॉवरकडे जास्त लक्ष आहे. तो एक गुंड ,बेशिस्त आणि घाणेरडा माणूस आहे. तो कधीच मिळून मिसळून राहात नाही."

अभिनव कश्यप यांनी सलमान खानच्या कुटुंबावर देखील टीका केली आहे. तो म्हणाला, "सलमान खानचे कुटुंब गेल्या 50 वर्षांपासून या इंडस्ट्रीत आहे. जे लोक त्यांच्या मताशी सहमत नसतात ते त्यांच्या मागे लागतात. त्यांना लोकांना ताब्यात ठेवायचे असते. सलमान खान बॉलिवूडमधील स्टार सिस्टमचा मुख्य आहे." मात्र अद्यापही सलमान खानने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

'दबंग' चित्रपटात सलमान खान पोलिसांच्या भूमिकेत दिसला. 'दबंग'च्या रिलीजनंतर अभिनव कश्यप आणि सलमान खान यांच्यात भांडणे झाली. अभिनव कश्यप यांनी 'दबंग 2'चे दिग्दर्शन करण्यास नकार दिला. तेव्हा सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाने अभिनव कश्यपचे करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी त्याला दिली. अशी अभिनव कश्यपने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कळवा ते ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे रुळांमधील नाल्यातील कचऱ्याला लागली मोठी आग

राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार, शपथविधी उद्याच होणार? भुजबळांनी दिली सविस्तर माहिती

E-Sakal No1 Marathi News: महाराष्ट्रात आम्हालाच वाचकांची पहिली पसंती; डिजिटल पत्रकारितेत ई-सकाळ सलग दुसऱ्यांदा ठरला नंबर 1

महाराष्ट्र हादरला! एकट्यात बसलेल्या मुलीवर वाकडी नजर; नराधमाकडून स्वतःच्या घरी नेऊन अत्याचार

UPI Wrong Transfer: UPI वरून चुकीच्या खात्यात पैसे गेले? नियम काय सांगतो? वाचा...

SCROLL FOR NEXT