RRR Movie Saam TV
मनोरंजन बातम्या

RRR: 'आर.आर.आर' च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, परदेशातील पुरस्कारातही दाक्षिणात्य चित्रपटच अव्वल...

दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या या चित्रपटाला आणखी एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाला आहे.

Chetan Bodke

RRR: दाक्षिणात्य चित्रपट 'आरआरआर' गोल्डन ग्लोब्स पुरस्कार जिंकल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चित्रपटसृष्टीचा बोलबाला पुन्हा होत आहे. आंतराष्ट्रीय स्तरावर एवढे यश मिळवणारा कदाचित पहिलाच चित्रपट आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या या चित्रपटाला आणखी एक पुरस्कार मिळाला आहे.

या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील (Foreign Language) चित्रपटासाठी समीक्षकांचा चॉईस पुरस्कार मिळाला. पुन्हा एकदा चित्रपटातील कलाकारांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. खुद्द क्रिटिक्स चॉइस अवॉर्डच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती सर्वांसोबत शेअर करण्यात आली आहे.

क्रिटिक्स चॉईस अवॉर्डने ट्विट करत माहिती दिली की, "RRR चित्रपटाच्या कलाकार आणि चित्रपटातील इतर सदस्यांचेही खूप खूप अभिनंदन. या चित्रपटाला परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड मिळाला आहे."

यासोबतच त्याने आरआरआरचे पोस्टरही शेअर केले आहे. चित्रपटातील ही स्पर्धा बरीच अटीतटीची होती. RRR सोबतच 'ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट', 'अर्जेंटिना 1985', 'बार्डो', 'फॉल्स क्रॉनिकल ऑफ अ हँडफुल ऑफ ट्रुथ्स', 'क्लोज' आणि 'डिसीजन टू लीव्ह' सारखे चित्रपटही या श्रेणीत होते.

पण या सर्व हॉलिवूड चित्रपटांना धुळ चारत भारतीय चित्रपट आरआरआरने हे विजेतेपद पटकावले. इतकंच नाही तर क्रिटिक्स चॉईस अवॉर्डच्या ट्विटर हँडलवर एसएस राजामौली यांचा एक व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये राजामौलींनी हातात ट्रॉफी धरताना दिसत आहे. राजामौली यांच्या चेहऱ्यावर हा आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. त्याचबरोबर हा पुरस्कार संपूर्ण भारतासाठी मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

SCROLL FOR NEXT