Criminal Justice 4 Announcement Saam Tv
मनोरंजन बातम्या

Criminal Justice 4 Announcement : पंकज त्रिपाठीच्या हाती आला नवा खटला; क्रिमिनल जस्टीसच्या चौथ्या भागात कोणाला देणार न्याय

Criminal Justice 4 Promo : क्रिमिनल जस्टीस ही वेबसीरीज सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या वेबसीरीजपैकी एक आहे. ही वेबसीरीज 'डिज्ने प्लस हॉटस्टार'वर रिलीज झालेली आहे.

Chetan Bodke

क्रिमिनल जस्टीस (Criminal Justice) ही वेबसीरीज सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या वेबसीरीजपैकी एक आहे. ही वेबसीरीज 'डिज्ने प्लस हॉटस्टार'वर रिलीज झालेली आहे. आतापर्यंत या वेबसीरीजचे तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहेत. आता लवकरच या वेबसीरीजचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच वेबसीरीजची निर्मात्यांनी घोषणा केली आहे.

या वेबसीरीजची घोषणा 'डिज्ने प्लस हॉटस्टार'च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून करण्यात आलेली आहे. शेअर केलेल्या प्रोमोच्या सुरूवातीला कोर्ट रुममधील एक सीन पाहायला मिळत आहे. त्या सीनमध्ये, वकील माधव मिश्रा (अभिनेता पंकज त्रिपाठी) म्हणातात, " शांतता राखा कोर्ट चालू आहे, आम्ही लवकरच येतोय. तिथे तुम्ही आम्हाला आरामात पाहा..." "कोर्ट जारी है, और नये सीज़न की तैयारी भी, आ रहे हैं माधव मिश्रा, क्रिमिनल जस्टिस के नए सीज़न के साथ!" असं कॅप्शन देत हा प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे.

वेबसीरीजमध्ये, पंकज त्रिपाठीने वकील माधव मिश्राचे पात्र साकारले आहे. या वेबसीरीजमध्ये प्रेक्षकांना कोर्ट रुम ड्रामा पाहायला मिळणार आहे. या कोर्ट रुम ड्रामामध्ये प्रेक्षकांना कोणतं नवं प्रकरण पाहायला मिळणार ? हे येत्या काही दिवसांतच कळेल. अद्याप या वेबसीरीजची रिलीज डेट समोर आलेली नाही. लवकरच वेबसीरीज रिलीज होणार असं कॅप्शन व्हिडीओमध्ये दिसतंय.

'क्रिमिनल जस्टिस' वेब सीरिजचा पहिला सीझन २०१८ मध्ये रिलीज झाला होता. ह्या सीरीजचे कथानक २००८ मध्ये रिलीज झालेल्या ब्रिटिश टीव्ही सीरियलची भारतीय आवृत्ती आहे. पहिल्या सीझनमध्ये, विक्रांत मॅसी आणि जेसी श्रॉफसारखी तगडी स्टारकास्ट होती. 'क्रिमिनल जस्टिस: बिहाइंड क्लोस्ड डोअर्स' हा 'क्रिमिनल जस्टिस'चा दुसरा सीझन होता. हा सीझन २०२० मध्ये रिलीज झाला होता. 'क्रिमिनल जस्टिस: इनकमप्लिट ट्रुथ' हा तिसरा सीझन आहे. २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT