Mukta Burve Birthday : 'मुक्ताताई तू माझं आयडॉल आणि इन्स्पिरेशन...'; 'राणी'च्या वाढदिवशी नम्रताने शेअर केली खास पोस्ट
Namrata Sambherao Shared Mukta Burve Birthday Special PostInstagram

Mukta Burve Birthday : 'मुक्ताताई तू माझं आयडॉल आणि इन्स्पिरेशन...'; 'राणी'च्या वाढदिवशी नम्रताने शेअर केली खास पोस्ट

Namrata Sambherao Post : आज मराठमोळी अभिनेत्री मुक्ता बर्वेचा वाढदिवस आहे. मुक्ताच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री नम्रता संभेराव हिने खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय तसेच सर्वगुणसंपन्न आणि बहुगुणी अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेची ओळख आहे. मुक्ताने आजवर मराठी फिल्म इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट चित्रपट दिलेले आहेत. तिच्या कामाचं कायमच चाहते कौतुक करतात. मुक्ताने 'जोगवा', 'डबलसीट', 'मुंबई पुणे मुंबई', 'वाय' आणि नुकताच रिलीज झालेला 'नाच गं घुमा' चित्रपटात काम करुन आपले अभिनय कौशल्य तिने सिद्ध केले आहे. मुक्ताचा आज ४५ वा वाढदिवस आहे. तिचा जन्म १७ मे १९७९ रोजी पुण्यात झालेला आहे.

Mukta Burve Birthday : 'मुक्ताताई तू माझं आयडॉल आणि इन्स्पिरेशन...'; 'राणी'च्या वाढदिवशी नम्रताने शेअर केली खास पोस्ट
Karthik Kumar And Suchitra News : 'तो गे आहे...', गायिकेने घटस्फोटाच्या ७ वर्षांनंतर आधीच्या नवऱ्याबद्दल केला धक्कादायक दावा

सध्या मुक्ताचा आणि नम्रता संभेरावचा 'नाच गं घुमा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने फक्त एका महिन्यातच १४ ते १५ कोटींची कमाई केलेली आहे. नम्रता आणि मुक्ता दोघीही चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. मोलकरीणीच्या भूमिकेत नम्रता तर मालकीण बाईंच्या भूमिकेत मुक्ता आहे. आज मुक्ताच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री नम्रता संभेरावन अभिनेत्रीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये नम्रता संभेराव म्हणते, "मुक्ता ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा... तु माझं आयडॉल आणि इन्स्पिरेशन आहे. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत. आपला चित्रपट सुपरहिट झालाय ताई... तुझ्यासारख्या दिग्गज बलाढ्य अभिनेत्रीसमोर उभं राहण्याची ताकद मला तुझ्यामुळेच मिळाली कारण तू खूप आपलंस केलंस कम्फर्टेबल केलं आहेस. मला एवढं बळ दिल्याबद्दल मनापासून मी तुझे आभार मानते. मी तुझी अजुन मोठ्ठी चाहती झाले आहे. आता तू माझी मैत्रिण सुद्धा झालीस म्हणून थोडी कॉलरपण टाईट झालीय. लव्ह यू सो मच ताई..."

Mukta Burve Birthday : 'मुक्ताताई तू माझं आयडॉल आणि इन्स्पिरेशन...'; 'राणी'च्या वाढदिवशी नम्रताने शेअर केली खास पोस्ट
Poonam Pandey News : पूनम पांडेचा प्रायव्हेट व्हिडीओ कोणी व्हायरल केला?, अभिनेत्रीने सांगितला घडलेला सर्व किस्सा

मुक्ता बर्वे मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या अभिनयाची आणि तिच्या साधेपणाचे कायमच चाहते फार कौतुक करतात. मुक्ता शेवटची 'वाय' चित्रपटात दिसली होती. आता अभिनेत्री 'वाय'नंतर 'नाच गं घुमा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर १ मे रोजी रिलीज झालेला आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत, नम्रता संभेराव, मुक्ता बर्वे, सारंग साठ्ये, सुकन्या कुलकर्णी, सुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी, सुनील अभ्यंकर आणि बालकलाकार मायरा वायकुळ आहे.

Mukta Burve Birthday : 'मुक्ताताई तू माझं आयडॉल आणि इन्स्पिरेशन...'; 'राणी'च्या वाढदिवशी नम्रताने शेअर केली खास पोस्ट
Cannes Festival 2024 : हात फ्रॅक्चर असतानाही ऐश्वर्याची कान्स रेड कार्पेटवर रुबाबात एन्ट्री, लेक आराध्याचं होतंय कौतुक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com