Zaheer-Sagarika Instagram/@zaheer_khan34
मनोरंजन बातम्या

Sagarika Ghatge Birthday: झहीर खान आणि सागरिकाची फिल्मी Love Story

बॉलीवूड आणि क्रिकेटचे नाते नेहमीच खास राहिले आहे. दोघांमध्ये एक ग्लॅमर आहे. अनेक क्रिकेटर्सचे हृदय बॉलीवूड अभिनेत्रींवर आले आहे आणि अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी क्रिकेटर्सना आपला जीवनसाथी म्हणून निवडले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलीवूड आणि क्रिकेटचे नाते नेहमीच खास राहिले आहे. दोघांमध्येही ग्लॅमर आहे. अनेक क्रिकेटर्सना बॉलीवूड अभिनेत्रींवर प्रेम आले आहे आणि अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी क्रिकेटर्सना आपला जीवनसाथी म्हणून निवडले आहे. (Happy birthday Sagarika Ghatge)

‘फॉक्स’, ‘मिले ना मिले हम’ या चित्रपटात काम करणारी लोकप्रिय अभिनेत्री सागरिका घाटगेचा आज 8 जानेवारी रोजी वाढदिवस आहे. ‘चक दे इंडिया’तील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार सागरीकाने पटकावला आहे. सागरिकाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज झहीर खानशी लग्न केले आहे. अतिशय शांत स्वभाव असलेला झहीर आणि त्याच्या अगदी उलट असलेली सागरिका यांची प्रेमकहाणी रंजक आहे.

झहीर आणि सागरिकाची प्रेमकथा खूपच फिल्मी आहे. अंगद बेदी आणि इतर काही मित्रांमुळे म्हणजेच कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून दोघांची भेट एका पार्टीत झाली होती असे बोलले जाते. तेव्हापासून त्यांची ओळख झाली त्यानंतर दोघांनी जवळपास दीड वर्ष एकमेकांना डेट केले. वृत्तानुसार, पहिल्या भेटीतच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांच्या नंतर भेटीगाठी वाढल्या. तसेच हे दोघे अनेक कार्यक्रमांमध्येही ते एकत्र दिसू लागले. इतकेच नव्हे तर आयपीएल IPL सामन्यांवेळीही सागरिका त्याला पाठिंबा देताना दिसून आली होती.

हे दोघे पहिल्यांदा 2016 मध्ये युवराज सिंग आणि हेजल कीचच्या लग्नात दिसले होते. तेव्हापासून अशी चर्चा होती की दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या लवकरच लग्न करू शकतात चर्चा होती. (Sagarika ghatge birthday news in marathi)

हे देखील पहा-

पण त्यांच्या लग्नात अडथळा निर्माण झाला होता कारण दोघांचे धर्म भिन्न होते. झहीर मुस्लिम आणि सागरिका हिंदू होती. अशा परिस्थितीत दोघांसाठी लग्न करणे इतके सोपे नव्हते. यासाठी दोघांना खूप काही पापड लाटावे लागले होते.

त्यामुळे झहीर खानने सागरिकाला त्याच्या कुटुंबीयांशी ओळख व्हावी त्याने म्हणून चक दे ​​इंडियाची सीडी मागवली होती आणि तिचा तो चित्रपट त्याच्या कुटुंबीयांना दाखवला होता. यानंतर कुटुंबीयांना सागरिका आवडली आणि त्यानंतर ते दोघांच्या लग्नासाठी तयारही झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुतीत पुन्हा एकदा बिघाडी! भाजप-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत क्षुल्लक कारणावरुन वाद

Delhi Terror Blast: ३२ कार बॉम्बने दिल्ली उडवण्याचा कट, बॉम्ब स्फोटांचा खरा सूत्रधार कोण? हँडलरचे नाव आलं समोर

Potato Recipe : नेहमीची बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा ढाबा स्टाइल 'हा' पदार्थ

Children's Day 2025 Speech: मुलांना मराठीत लिहून द्या बालदिनानिमित्त भाषण; टाळ्यांच्या कडकडाटा होईल कौतुक

Maharashtra Live News Update: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

SCROLL FOR NEXT