Coolie vs War 2 Box Office Report Saam Tv
मनोरंजन बातम्या

Coolie VS War 2: रविवारी 'कुली'चा बोलबाला, 'वॉर २'ला पछाडले; चौथ्या दिवशी केलं इतक्या कोटींचं कलेक्शन

Coolie VS War 2 Box Office Collection: सध्या चित्रपटगृहांमध्ये अनेक चित्रपट सुरू आहेत, वेगवेगळ्या शैलीतील हे चित्रपट प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करत आहेत. रविवारी वीकेंडचा फायदा घेत 'वॉर २', 'कुली' यांनी चांगली कमाई केली.

Shruti Vilas Kadam

Coolie VS War 2 Box Office Collection: सध्या चित्रपटगृहांमध्ये अनेक चित्रपट सुरू आहेत, वेगवेगळ्या शैलीतील हे चित्रपट प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करत आहेत. रविवारी वीकेंडचा फायदा घेत 'वॉर २', 'कुली' आणि 'महावतार नरसिंह' यांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत. जाणून घ्या, कोणत्या चित्रपटाने किती कमाई केली आहे?

'वॉर २'

ऋतिक रोशन आणि दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआर यांच्या 'वॉर २' या चित्रपटाने रविवारी थिएटरमध्ये ४ दिवस पूर्ण केले. या चित्रपटाने चौथ्या दिवशी ३१.३ कोटी रुपये कलेक्शन केले आहे. आतापर्यंत एकूण कलेक्शन १७३.९१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'वॉर २' चित्रपटाचे बजेट ४०० कोटी रुपये आहे. काही दिवसांतच या चित्रपटाने बजेटच्या निम्मी कमाई केली आहे.

'कुली

दक्षिणातील सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'कुली' या चित्रपटाची सुरुवातीपासूनच प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ आहे. या चित्रपटाने रविवारी म्हणजेच चौथ्या दिवशी ३४ कोटी रुपये कमावले. कमाईच्या बाबतीत त्याने 'वॉर २' ला मागे टाकले. चित्रपटाचे एकूण कलेक्शनही आतापर्यंत १९८.२५ कोटी रुपये आहे. रजनीकांतचा हा चित्रपट ३५० कोटी रुपयांमध्ये बनवला गेला आहे. या चित्रपटानेही बजेटच्या निम्म्याहून अधिक रक्कम वसूल केली आहे.

'महावतार नरसिंह'

सध्या 'महावतार नरसिंह' हा अॅनिमेटेड चित्रपटही थिएटरमध्ये सुरु असून त्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. हा चित्रपट २४ दिवसांपासून थिएटरमध्ये आहे. रविवारी म्हणजेच २४ व्या दिवशी या चित्रपटाने ८ कोटी रुपये कमावले आहेत. त्याचे एकूण कलेक्शनही २१०.३५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. माहितीनुसार १० ते १५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेला या चित्रपट त्याच्या कलेक्शनने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले आहे.

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेची प्रारूप मतदार यादी जाहीर

Asambhav: नव्या नात्यातील दरवळ बहरणार; मुक्ता बर्वे आणि सचित पाटील यांची रोमॅन्टिक केमेस्ट्री प्रेक्षकांच्या समोर

Whatsapp Number Leak: सावधान! आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक, व्हॉट्सअ‍ॅपवरील ३.५ अब्ज युजर्सचे मोबाइल नंबर चोरी

Weight Loss: वजन घटवण्यात सेमाग्लुटाइडचा नवा वैज्ञानिक फॉर्म्युला ठरतोय गेमचेंजर

Shocking : मुंबई पुन्हा हादरली! सराफाची दुकानात घुसून निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT