Coolie Advance Booking Collection Day 1: सुपरस्टार रजनीकांत यांचा 'कुली' हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासोबत हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या 'वॉर-२' हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. दोन्ही चित्रपटांसाठी अॅडव्हान्स बुकिंग सुरू करण्यात आली असून दोन्ही चित्रपटांमध्ये काटें की टक्कर सुरु झाली आहे.
पण, आतापर्यंत रजनीकांतचा चित्रपट अॅडव्हान्स बुकिंग बाबतीत पुढे असल्याचे दिसून येत आहे. व्यापार तज्ज्ञांच्या मते, हा चित्रपट पहिल्याच दिवशी ८० कोटी रुपयांपर्यंत कमाई करू शकतो. हृतिक आणि ज्युनियर एनटीआर सारखे दोन मोठे स्टार एकत्रितपणे कमाईच्या बाबतीत सुपरस्टार रजनीकांतच्या चित्रपटाशी स्पर्धा करू शकत नाहीत.
रजनीकांतच्या 'कुली'चे पहिल्या दिवसाचे अॅडव्हान्स बुकिंग
चित्रपटाच्या कमाईचे आकडे जाहीर करताना, सॅकनिल्कने त्यांच्या अहवालात म्हटले आहे की आतापर्यंत सुमारे ६० हजार तिकिटे विकली गेली आहेत आणि चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच बॉक्स ऑफिसवर १८ कोटी ३५ लाख रुपये कमावले आहेत. हृतिक-एनटीआरचा 'वॉर-२' या बाबतीत खूपच मागे आहे, कारण त्याचे पहिल्या दिवसाचे अॅडव्हान्स बुकिंग फक्त ४ कोटी २४ लाख रुपये झाले आहे. लोकेश कनागराज दिग्दर्शित 'कुली' हा चित्रपट घोषणेपासूनच चर्चेत आहे आणि त्याच्या ट्रेलरलाही जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.
पहिल्या दिवशी चित्रपट किती कोटींची कमाई करू शकतो?
रजनीकांत चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत, तर चित्रपटात नागार्जुन अक्किनेनी आणि आमिर खानसारखे कलाकारही महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. आता प्रश्न असा आहे की, रजनीकांतचा 'कुली' पहिल्या दिवशी किती कमाई करू शकतो? ट्रेड एक्सपर्ट सुमित काडेलच्या मते, हा चित्रपट जगभरातील बॉक्स ऑफिसवर ७० ते ८० कोटींचा आकडा ओलांडेल. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त, निर्माते रजनीकांतचा चित्रपट तमिळ, तेलगू, कन्नड आणि इंग्रजीमध्येही प्रदर्शित होणार आहे.