शीख समुदायाविरोधात वादग्रस्त वक्तव्य प्रकरण; कंगना रणौत जबाब नोंदवण्यासाठी हजर Saam Tv
मनोरंजन बातम्या

शीख समुदायाविरोधात वादग्रस्त वक्तव्य प्रकरण; कंगना रणौत जबाब नोंदवण्यासाठी हजर

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौतला आज मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदवणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौतला आज मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदवणार आहे. काही वैयक्तिक कामामुळे ती काल पोलिस ठाण्यात हजर राहू शकली नाही. कंगना रणौत तिचा जबाब नोंदवण्यासाठी सकाळी 11 च्या सुमारास खार पोलीस ठाण्यात पोहोचली आहे. शीख समुदायाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी खार पोलिस ठाण्यात तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. (kangana ranaut news)

दरम्यान, बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत बहुतेक वेळा तिच्या वक्तव्यांमुळे जास्तच चर्चेत असते. आता परत एकदा ती आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादामुळे चर्चेत आली आहे. कंगना रणौतविरुद्ध (Kangana Ranaut) मुंबईतील (Mumbai) ४७ वर्षीय व्यापारी अमरजित सिंग संधू, दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समिती आणि शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांसह एफआयआर दाखल केला होता.

हे देखील पहा-

तक्रारकर्त्यांनी कंगनावर जाणूनबुजून आणि हेतुपुरस्सर आंदोलक शेतकर्‍यांना (farmers) खलिस्तानी दहशतवादी (Terrorist) म्हणून दाखवल्याचा आणि शीख समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. याबाबत मुंबई पोलिसांनी (police) तिला चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, सध्या वेळ नसल्याचे सांगत तिने चौकशीसाठी हजर होण्यास वेळ मागितला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना न्यायालयाने ठोठावला ३०० रुपयांचा आर्थिक दंड

Chanakya Niti : या व्यक्तींच्या हातात कधीच टिकत नाही पैसा, वेळीच बदला सवयी नाहीतर...

Jamun Seeds Benefits : जांभळाची बी आरोग्यासाठी फायदेशीर, शुगरपासून पचनाच्या त्रासावर करते मात

IIT मुंबई विद्यार्थी मृत्यू प्रकरण: साहिलचा क्लासरूममधील शेवटच्या २० मिनिटांचा CCTV फुटेज आला समोर

Thursday Horoscope : पैशांची बरसात अन् घरात आनंद! १२ राशींच्या व्यक्तींचा आजचा दिवस कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT