संतापजनक ! प्रसूतीच्या वेदनेने व्याकुळ असतांना महिला आरोग्य कर्मचाऱ्याच्या बेजबाबदारपणा चव्हाट्यावर

जीवघेण्या थंडीत प्रसूतेच्या वेदनेच्या व्याकुळ महिलेची आरोग्य केंद्राच्या दारात प्रसूती!
संतापजनक ! प्रसूतीच्या वेदनेने व्याकुळ असतांना महिला आरोग्य कर्मचाऱ्याच्या बेजबाबदारपणा चव्हाट्यावर
संतापजनक ! प्रसूतीच्या वेदनेने व्याकुळ असतांना महिला आरोग्य कर्मचाऱ्याच्या बेजबाबदारपणा चव्हाट्यावरविनोद जिरे

विनोद जिरे

बीड : प्रसूतीच्या वेदनेने व्याकुळ असल्यानं, आरोग्य केंद्रात दाखल होण्यासाठी आलेल्या महिलेसह नातेवाईकांना, आरोग्य केंद्रातील महिला कर्मचाऱ्याने, दाखल करून न घेता त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात (District Hospital Beed) जाण्याचा सल्ला दिला. अनेकदा नातेवाईकांनी विनंती केली, मात्र थोडीही माणुसकी न दाखवता, त्या महिला कर्मचाऱ्याने दाखल केले नाही. यातच प्रसूतीच्या वेदनेने व्याकुळ असणाऱ्या महिलेची, कडाक्याच्या थंडीत आरोग्य केंद्राच्या आवारात प्रसूती झाली. ही संतापजनक घटना दोन दिवसांपूर्वी मंगळवारी रात्री, बीडच्या (Beed) गेवराई तालुक्यातील मादळमोही प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली आहे.

गेवराई (Georai) तालुक्यातील तांदळा येथील सुरेखा कृष्णा माळी या महिलेला मंगळवारी रात्री प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने, नातेवाईकांनी तिला मादळमोही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आणले होते. मात्र तेथील कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी तपासणी न करता "तुम्ही बीडला जा" म्हणत जबाबदारी झटकली.

संतापजनक ! प्रसूतीच्या वेदनेने व्याकुळ असतांना महिला आरोग्य कर्मचाऱ्याच्या बेजबाबदारपणा चव्हाट्यावर
विधानसभा अध्यक्षपद - आवाजी मतदानाबाबत आज निर्णय शक्य

यावेळी नातेवाईकांनी विनवणी करुनही महिलेला आरोग्य केंद्रात दाखल केले नाही. विशेष म्हणजे यावेळी महिला कर्मचाऱ्याच्या पतीने देखील यामध्ये हस्तक्षेप केला आणि बोलला. तर आरोग्य केंद्रात दाखल न करुन घेतल्याने, संबंधीत महिलेची आरोग्य केंद्राच्या दारातच कडक थंडीत प्रसुती झाली.

हे देखील पहा-

हा संतापजनक प्रकार तेथील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे ओढावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर आरोग्य केंद्रात सर्व सोयी उपलब्ध असताना, प्रसुतीसाठी आलेल्या या महिलेची तपासणी केली नाही, शिवाय अ‍ॅडमिट करुन न घेतल्याने आरोग्य दारातच महिलेची प्रसूती झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुदैवाने बाळ-बाळंतीण सुखरूप आहे. दरम्यान आता या बेजबाबदार महिला कर्मचाऱ्यासह त्या दिवशी कोणत्या डॉक्टरची ड्युटी होती ? ते डॉक्टर हॉस्पिटलमध्ये होते की त्यांनी दांडी मारली होती ? याची चौकशी करून यांना निलंबित करण्याची मागणी, या महिलेच्या पतीसह नातेवाईकांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com