Actress Poonam Pandey faces backlash after being chosen to play Mandodari, wife of Ravana, in Delhi’s Ramlila festival. Saam TV
मनोरंजन बातम्या

Poonam Pandey: दिल्लीच्या रामलीलेत पूनम पांडेची एंट्री; मंदोदरीच्या भूमिकेवरून पेटला नवा वाद

Cultural Outrage As Bold Actress Poonam Pandey: वादग्रस्त हॉट अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा नव्या वादात सापडलीय.. मात्र हा वाद नेमका काय आहे? त्यावर हिंदूत्ववादी संघटनांनी आक्षेप का घेतलाय?

Bharat Mohalkar

ही आहे सतत वादाच्या भोवऱ्यात असलेली आणि आपल्या मादक अदांमुळे प्रसिद्ध असलेली पूनम पांडे... आता हिच पूनम पांडे थेट रावणाची पत्नी मंदोदरीच्या भूमिकेत दिसणार आहे.. त्यावरुन वादाची ठिणगी पडलीय... तर मंदोदरी सदाचारी, पतिव्रता आणि मर्यादेचं प्रतिक असल्याचं सांगत पूनम पांडेच्या निवडीला महंतांनी जोरदार विरोध केलाय..

दिल्लीत 22 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या रामलीलाच्या तयारीला वेग आलाय.. या रामलीलेत आर्य बब्बर रावणाच्या तर पूनम पांडे ही मंदोदरीच्या भूमिकेत असणार आहे.. मात्र पूनम पांडे बोल्डनेसमुळे प्रसिद्ध असल्याने तिच्या निवडीवर हिंदूत्ववादी संघटनांचा आक्षेप आहे... मात्र पूनम पांडे आता पहिल्यांदाच वादात सापडली नाही तर याआधीही वेगवेगळ्या वादात पांडे चर्चेत होती..

2011

वर्ल्ड कपमध्ये भारत जिंकल्यास कपडे काढून डान्स करण्याबाबत वक्तव्य

2012

आयपीएलमध्ये कोलकाता नाईड रायडर्स जिंकल्यानंतर न्यूड फोटो पोस्ट केल्याने वाद

2013

नशा फिल्मच्या पोस्टरमधील बोल्ड सीनवरुन वाद

2017

अडल्ट कन्टेट असलेलं मोबाईल अॅप सुरु केलं

2019

राज कुंद्रा पॉर्न प्रकरणात पूनम पांडेचं नाव

2024

सर्व्हायकल कॅन्सरमुळे मृत्यू झाल्याची अफवा पसरवल्याने वाद

मादक अदा, अश्लील हावभाव यामुळे वादात सापडलेली पूनम पांडे आता थेट पंचकन्या म्हणून ओळख असलेल्या मंदोदरीची भूमिका करणार आहे.. त्यामुळे हा नवा सांस्कृतिक वाद उफाळून आलाय.. त्यामुळे आयोजकांकडून हिंदूत्ववादी संघटनांचा आक्षेप मान्य करुन पूनम पांडेला रामलीलामधून काढलं जाणार की पूनम पांडेकडेच भूमिका कायम ठेऊन वाद कायम ठेवणार .. याकडे देशाचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणच्या शेतकऱ्यांना दिलासा, दिवाळीआधीच नुकसान भरपाई मिळणार

Maharashtra Live News Update: सत्ताधाऱ्यांच्या सत्ता प्राप्तीच्या चोरवाटा आम्ही अडवल्यात - उद्धव ठाकरे

Shirdi Sai Baba : साईचरणी सोन्याचा मुलामा असलेली छत्री अर्पण; संस्थानला २३ लाखांचा धनादेशही सुपूर्द

Kalyan Famous Places: जोडीदारासोबत बाईकवर फिरा कल्याणमधील प्रसिद्ध 5 ठिकाणे, स्वर्गसुखाचा येईल आनंद

Actor Death: महाभारतातील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी; बॉलिवूडवर शोककळा

SCROLL FOR NEXT