Congress leader slams Sanjay Dutt, calls him ‘Khalnayak’ over RSS 100th anniversary wishes. saam tv
मनोरंजन बातम्या

‘नायक नहीं खलनायक है तू'; काँग्रेसचे नेते संजू बाबावर लय संतापले, काय आहे कारण?

Congress Leader Slams Sanjay Dutt: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या बॉलिवूड अभिनेता संजय दत्तवर टीका होत आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने त्यांच्यावर टीका करत त्यांना 'खलनायक' म्हटले आहे.

Bharat Jadhav

  • संजय दत्त यांनी आरएसएसच्या १०० व्या वर्धापन दिनाला शुभेच्छा दिल्या.

  • काँग्रेस नेत्यांचा यावर संताप व्यक्त झाला.

  • व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काँग्रेस समर्थक संजय दत्तला जोरदार ट्रोल करत आहेत.

‘नायक नहीं खलनायक है तू, अपने पिता का नालायक है तू…’. हे गाणं तुम्हाला आठवत असेल. हे गाणं आहे संजय दत्तच्या खलनायक चित्रपटातील. याच गाण्याच्या ओळी म्हणत काँग्रेस नेत्यानं संजू बाबावर संताप व्यक्त केलाय. बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. त्यावरून एका काँग्रेस नेत्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी अभिनेता संजय दत्तला थेट खलनायक म्हटलं.

काँग्रेसचे नेते सुरेंद्र राजपूत यांनी संजय दत्त यांच्यावर जोरदार निशाणा साधला. संजय दत्त यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर केला होता.

या व्हिडिओमध्ये संजय दत्त यांनी आरएसएसचं कौतुक केलं होतं. संघ सदैव देशासोबत उभा आहे, जेव्हा-जेव्हा देशामध्ये नौसर्गिक आपत्ती आल्या तेव्हा-तेव्हा संघ देशासोबत उभा राहिला असं संजय दत्त यांनी आपल्या पोस्ट म्हटलं होतं. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काँग्रेस समर्थक संजय दत्तला जोरदार ट्रोल करत आहेत.

दरम्यान, संजय दत्त यांचे वडील सुनील दत्त हे काँग्रेसचे खासदार होते. तर संजय दत्त यांची बहीण प्रिया दत्त या देखील काँग्रेसच्या नेत्या आहेत. अभिनेते सजंय दत्त हे कायमच चर्चेत राहत असतात. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणापासून ते चर्चेत आले. त्यावेळी घरात अवैध पद्धतीनं शस्त्रं ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यामुळे त्यांना ताडा (TADA) अंतर्गत अटक करण्यात आली होती. संघाचं कौतुक केल्यानं संजय दत्त चर्चेमध्ये आलेत. त्यांच्यावर काँग्रेस समर्थकांकडून टीका होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

Pune Crime : पुण्यातल्या भोंदूबाबानं 14 कोटींना लुबाडलं; इंजिनीअरला आणलं रस्त्यावर, नेमकं काय घडलं? VIDEO

Kalyan : कल्याणमधील नियोजन शून्य कारभार चव्हाट्यावर; शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प, कारण काय?

India Women Cricket Team : अभिमानास्पद क्षण! विश्वविजेत्या लेकींनी घेतली PM मोदींची भेट, पहिली झलक समोर

SCROLL FOR NEXT