bharti singh second baby  Saam tv
मनोरंजन बातम्या

सगळ्यांना खदखदून हसवणारी कॉमेडी क्वीन दुसऱ्यांदा झाली आई; शुटिंगला जाताना आल्या प्रसृती कळा

Bharti Singh Second Baby : सगळ्यांना खदखदून हसवणारी कॉमेडी क्वीन भारती सिंह दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिला शुटिंगला जाताना प्रसृती कळा आल्या.

Vishal Gangurde

कॉमेडी क्वीन भारती सिंह झाली दुसऱ्यांदा आई

मुलाला जन्म दिल्यानंतर भारतीचा आनंद गगनात मावेना झालाय

भारती आणि तिच्या नवऱ्यावर अभिनंदनाचा वर्षाव

कॉमेडी क्वीन भारती सिंह दुसऱ्यांदा आई झाली आहे. लाफ्टर क्वीनने वयाच्या ४१ व्या वर्षी मुलाला जन्म दिला आहे. दुसऱ्यांना बाळाला जन्म दिल्यानंतर भारत सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांना आनंदाचा पारावार राहिला नाही. या जोडप्यावर सोशल मीडियातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

भारती सिंहने काही दिवसांपूर्वी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मनोरंजनसृष्टीतील अनेकांनी हजेरी लावली होती. भारतीने सोशल मीडियावरही या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ शेअर केला होता.

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन झाल्यानंतर त्यांचे मित्रमंडळी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. भारती सिंह एका कार्यक्रमाच्या शुटिंगला जाताना तिला प्रसृतीच्या वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. भारती सिंहने एका गोंडस बाळाला जन्म दिला. तिने दुसऱ्यांदा मुलाला जन्म दिला.

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया या दोघांनी त्यांचं दुसरं बाळ जन्माला येणार असल्याची बातमी चाहत्यांना आधीच शेअर केली. भारती सिंहने दुसऱ्यांदा गरोदर झाल्याची बातमी स्विट्जरलँडमधून ही माहिती दिली होती. भारती सिंहने गरोदर असल्याचं जाहीर केल्यानंतर तिच्या बाळाची चाहतेही वाट पाहत होते. तिने एका व्लॉगमध्ये घरात लक्ष्मी जन्माला यावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. परंतु दोघांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

भारती सिंहने पहिल्या बाळाला कधी जन्म दिला?

भारती सिंहचा पहिला मुलगा लक्ष्य उर्फ गोला याला २०२२ साली जन्म दिला होता. पहिल्या बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्या बाळाची देखील इच्छा व्यक्त केली होती. भारती सिंहने अनेक मुलाखतीत तिला यंदा मुलगा नव्हे तर मुलगी हवी, अशी इच्छा व्यक्त केली होती. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया या दोघांनी २०१७ साली गोव्यामध्ये कुटुंब आणि मित्रमंडळीच्या उपस्थितीत लग्न केलं होतं. यानंतर दोघांनी एकत्र अनेक रिअॅलिटी शो होस्ट केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मशाली'वर निवडून आले, पण आदेश मोडले; बेपत्ता ४ नगरसेवकांवर ठाकरेंचा निलंबनाचा इशारा

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण सादर करणार? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तर घडणार; ५ राशींच्या लोकांनी घराबाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नये, अन्यथा...

अमेरिकेचा इराणवरील हल्ल्याचा सिक्रेट प्लॅन? अमेरिका-इराणमध्ये महायुद्ध पेटणार?

काँग्रेस-MIMच्या नगरसेवकांमध्ये राडा, अकोल्यात भाजपचाच महापौर

SCROLL FOR NEXT