अभिनेत्री आणि कॉमेडियन कॅथरीन ओ’हारा यांचे ७१ व्या वर्षी निधन
कॅथरीन ओ’हारा अनेक विनोदी चित्रपटांसाठी प्रसिद्ध होत्या
त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टी आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
एमी पुरस्कार विजेत्या विनोदी अभिनेत्री कॅथरीन ओ'हारा यांचे शुक्रवारी वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले आहे. आफ्टर अवर्स, हार्टबर्न, बीटलज्यूस, होम अलोन आणि होम अलोन २:लॉस्ट इन न्यू यॉर्क या सारख्या चित्रपटांमधून अभिनेत्रीला प्रसिद्धी मिळाली. या अभिनेत्रीच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
अभिनेत्री कॅथरीन ओ'हारा या कॅनडामधल्या प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री होत्या. ४ मार्च १९५४ रोजी त्यांचा जन्म झाला. त्या कॅनडामधील लॉस एंजेलीस येथे राहत होत्या. त्यांच्या पश्चात पती बो वेल्च आणि मुले मॅथ्यू आणि ल्यूक असा परिवार आहे. कॅथरीन ओ'हारा या उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे.
अभिनेत्री कॅथरीन ओ'हारा यांच्या कारकिर्दीची सुरुवात टोरंटोमधील सेकंड सिटी टेलिव्हिजनमध्ये (१९७६-१९८४) एका स्केच कॉमेडी मालिकेने झाली. याचं मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्यासोबत त्यांची लग्नगाठ बांधली गेली. त्यांनतर त्यांनी 'आफ्टर अवर्स' (१९८५), 'हार्टबर्न' (१९८६), 'बीटलज्यूस' (१९८८), 'होम अलोन' (१९९०) आणि 'होम अलोन २: लॉस्ट इन न्यू यॉर्क' (१९९२) या सारख्या चित्रपटांमधून आपली ओळख तयार केली.
अभिनेत्री कॅथरीन ओ'हारा बऱ्याच काळापासून आजाराने त्रासलेल्या होत्या असल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्थेने म्हटले. तसेच याचं आजाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कॅथरीन ओ'हारा यांच्या निधनानंतर त्यांचे सहकलाकार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत दुःख व्यक्त केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.